ज्ञानवापी मंदिर की मशीद? युक्तिवाद पूर्ण: वाराणसी कोर्टाने राखून ठेवला निर्णय

मशीद पक्षाच्या बाजुने दोन नविन वकिलांच वकिलपत्र दाखल करण्यात आलं
gyanvapi
gyanvapiesakal

ज्ञानवापी मशीद आणि श्रृंगार गौरी मंदिर प्रकरणी दाखल केलेल्या याचिकेवर जिल्हा न्यायालयात सुनावनी चालु होती. त्यातच अंजुमन व्यवस्था मशीद कमिटीच्या वतीने आज झालेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला. यानंतर श्रृंगार गौरी मंदिराचे हक्ककरते मशीदीच्या बाजूच्या वकिलांचे उत्तर देण्यात आले.

त्या नंतर हिंदू बाजूच्या युक्तिवादावर मशीदीच्या पक्षाने आपले म्हणने मांडले. काही दिवसाच्या प्रक्रिये नंतर आज दोन्ही पक्षाचा युक्तिवाद संपला आहे. त्या नंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला आहे. 12 सप्टेंबर रोजी याप्रकरणी निर्णय होऊ शकतो. महत्त्वाचे म्हणजे अंजुमन व्यवस्था मशीद समितीचे मुख्य वकील अभय नाथ यादव यांचे या महिन्याच्या सुरुवातीला अचानक निधन झाले होते.

gyanvapi
WhatsApp, Facebookच्या प्रायव्हसी नियमांबाबत हायकोर्टात उद्या निकाल

त्याच्या नंतर मशीद पक्षाच्या लोकांनी न्यायालयाकडे वेळ मागितला होता. त्याची तारीक 18 ऑगस्ट पर्यंत दिली होती. त्यानंतर मशिद पक्षाच्या बाजुने दोन नविन वकिलांच वकिलपत्र दाखल करण्यात आल. आणि 10 दिवसांचा वेळ मागण्यात आली, त्यावर न्यायालयाने जास्त वेळ देण्यासाठी नकार दिला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com