Pankaja and Dhananjay Munde | मुंडे भाऊ-बहिणींची मंचावर खोडकर 'टोले'बाजी; उपस्थितांची मने जिंकली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pankaja and Dhananjay Munde
मुंडे भाऊ-बहिणींची मंचावर खोडकर 'टोले'बाजी; उपस्थितांची मने जिंकली

मुंडे भाऊ-बहिणींची मंचावर खोडकर 'टोले'बाजी; उपस्थितांची मने जिंकली

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे आणि त्यांच्या भगिनी, भाजपा नेत्या पंकजा मुंडे हे दोघे भाऊ-बहीण राजकारणाच्या रिंगणात सातत्याने एकमेकांवर टीका करत असतात. फटकेबाजी, टोलेबाजी करत दोघेही एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात असतात. मात्र अनेकदा त्यांच्यातलं प्रेमही दिसून येतं. एकमेकांच्या तब्येतीची आपुलकीने चौकशी करणं, कौटुंबिक संकटं, सोहळ्यात प्रेमाने धावून जाणं, अशा प्रसंगांतून भावा-बहिणीतलं प्रेम सतत दिसत असतं. (Dhananjay Munde and pankaja munde together in a programme)

हेही वाचा: धनंजय मुंडेंवर ब्रीच कँडीमध्ये उपचार, पंकजांसह प्रितम मुंडे भेटीसाठी हजर

असाच एक प्रसंग एका सार्वजनिक कार्यक्रमात घडला आहे. सुप्रसिद्ध डॉक्टर तात्याराव लहाने (Dr. Tatyarao Lahane) यांच्या रघुनाथ रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा आज पार पाडला. या कार्यक्रमादरम्यान व्यासपीठावर शरद पवार(Sharad Pawar), आदित्य ठाकरे(Aditya Thackeray), तात्याराव लहानेंसह पंकजा मुंडे(Pankaja Munde) आणि इतरही मान्यवर बसले होते. मागून धनंजय मुंडे येत होते. दरम्यान, पंकजा यांच्या जवळ येताच त्यांनी त्यांच्या डोक्यात प्रेमाने टोला मारला. त्यामुळे त्यांनी उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं. या दोघांमधला हा खोडकर प्रेमाचा प्रसंग चांगलाच चर्चेचा विषय ठरला.

हेही वाचा: काळजी, दगदग नको करु ! तब्येतीला जप, पंकजा यांचा भाऊ धनंजय मुंडेंना सल्ला

शरद पवारांच्या लेन्समधून पाहणारे आमचे बंधू; पंकजा मुंडेंचा टोला

या कार्यक्रमात बोलत असताना पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंना टोला लगावला आहे. आपल्या भाषणात पंकजा मुंडे म्हणाल्या, "ज्यांच्या राजकीय दृष्टीच्या लेन्सेस कुणाकडेच नसतील असे शरद पवार, ज्यांच्या लेन्सेस सगळ्यांना सूट करतील असे बाळासाहेब थोरात, जे नवीन दृष्टी देतील असे आदित्य ठाकरे, सोफिस्टिकेटेड लेन्सेस अमित देशमुख तसंच मुंडे महाजन मैत्रीतून आणि आता राष्ट्रवादीच्या, शरद पवारांच्या लेन्सेसमधून दिसणारे बंधू धनंजय मुंडे. "

Web Title: Dhananjay Munde Slapped Pankaja Munde With Love In Live Programme

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top