हज यात्रेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू; जाणून घ्या शेवटची तारीख-नियम

Hajj Pilgrimage
Hajj Pilgrimageesakal
Updated on: 

2022 मध्ये होणाऱ्या हज यात्रेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सोमवारपासून सुरू झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी 2022 असून हज कमिटी ऑफ इंडियाने हज अॅक्शन प्लॅन 2022 जारी केला आहे. फॉर्मचे स्वरूप hajcommittee.gov.in या वेबसाइटवर अपलोड करण्यात आले आहे. मात्र महत्वाची गोष्ट म्हणजे यंदा 65 वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक हजसाठी अर्ज करू शकणार नाहीत. लोक 'हज मोबाईल अॅप'द्वारेही अर्ज करू शकतील.

नियम काय असतील?

यात्रेकरुना हज यात्रेच्या एक महिन्यापूर्वी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेणे आवश्यक असेल. तसेच, अर्जदारांच्या पासपोर्टची वैधता 31 डिसेंबर 2022 पर्यंत असली पाहिजे. 45 ते 65 वयोगटातील महिला महरमशिवाय (कुटुंबातील पुरुष) हजला जाणाऱ्या 4 ते 5 महिलांच्या गटात अर्ज करू शकतील.

तसेच यावर्षी भारतीय हज यात्रेकरू हे 'वोकल फॉर लोकल'ला प्रोत्साहन देतील आणि स्वदेशी वस्तू घेऊन यात्रेत सहभागी होतील. दरवर्षी हज यात्रेकरू सौदी अरेबियातून चादर, उशा, टॉवेल, छत्री आणि इतर वस्तू सौदी चलनात खरेदी करत असत. मात्र यावेळी यातील बहुतांश वस्तू भारतीय चलनात भारतात खरेदी केल्या जातील. या वस्तू सौदी अरेबियाच्या तुलनेत सुमारे ५० टक्के कमी दरात उपलब्ध असणार आहेत.

Hajj Pilgrimage
Maruti Celerio कारचे बुकिंग सुरु; देईल देशातील सर्वाधिक मायलेज

राज्य हज समितीचे सचिव राहुल गुप्ता यांनी सांगितले की, सौदी अरेबिया सरकारकडून हजसाठी अंतिम मार्गदर्शक तत्त्वे जारी होईपर्यंत अर्ज तात्पुरते मानले जातील. मक्का आणि मदिना येथे हज यात्रेकरूंना राहण्यासाठी हॉटेल्सची निवड करण्याची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही.

केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी देखील देशातील 10 शहरांमधून हजसाठी उपलब्ध असणाऱ्या विमान सेवेबद्दल माहिती दिली आहे. नकवी म्हणाले की, हज यात्रेकरूंची निवड प्रक्रिया कोरोनाव्हायरस प्रोटोकॉल आणि भारत आणि सौदी अरेबिया सरकारद्वारे ठरविल्या जाणार्‍या मानदंडांनुसार केली जाईल. ते म्हणाले की, हज 2022 साठी प्रस्थान केंद्रांची संख्या 21 वरून 10 करण्यात आली ते अहमदाबाद, बंगलोर, कोची, दिल्ली, गुवाहाटी, हैदराबाद, कोलकाता, लखनौ, मुंबई आणि श्रीनगर येथे आहेत.

Hajj Pilgrimage
"भाजप आता कोणत्याही राज्यात निवडणूक जिंकायला सक्षम"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Latest Marathi News Live Update
Woman Attacks Magistrate, Prosecutor and Police Officer
Congress MLA finds couple in  his room
Indian Air Force IL-76 Lands at Nyoma Airbase