Haldwani Ramlila Maidan purification controversy
esakal
हल्द्वानी : उत्तराखंडमधील हल्द्वानी येथील प्रसिद्ध रामलीला मैदानाच्या कथित ‘शुद्धीकरणा’वरून निर्माण झालेल्या वादाला आता नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणी नैनिताल पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्या अंजू यांच्या लेखी तक्रारीच्या आधारे हल्द्वानी कोतवाली पोलिस ठाण्यात आणखी एक एफआयआर दाखल केला आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तपासाची जबाबदारी पोलीस अधीक्षक (गुन्हे) जगदीश चंद्र यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.