Mallikarjun Kharge : मल्लिकार्जुन खर्गेंच्या सभेनंतर हिंदूत्ववादी संघटनांकडून मंचाचे शुद्धीकरण; काँग्रेसचा भाजपवर निशाणा- हा तर दलितांचा अपमान

Congress-BJP Controversy : उत्तराखंड काँग्रेस अध्यक्ष गणेश गोदियाल यांनी या कृतीचा तीव्र निषेध करत जातीय भेदभावाची आणि संकुचित मानसिकतेची निशाणी म्हटले. नैनितालच्या एसएसपींकडे निष्पक्ष चौकशी करून कायद्याचे उल्लंघन झाल्यास दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली.
Haldwani Stage Purification Sparks Controversy

Haldwani Stage Purification Sparks Controversy

esakal

Updated on

Haldwani Stage Purification Sparks Controversy : उत्तराखंडमधील हल्द्वानी येथे काँग्रेसच्या 'विजय शंखनाद' रॅलीदरम्यान काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी जनतेला संबोधित करण्यासाठी वापरलेल्या मंचाच्या 'शुद्धीकरणा'वरून वाद निर्माण झाला आहे. हिंदू संघटनांनी हा मंच शुद्ध करण्यासाठी धार्मिक विधी केले; या कृतीचा उत्तराखंड काँग्रेसने तीव्र निषेध केला आहे. पक्षाचे अध्यक्ष गणेश गोदियाल यांनी याला भाजपच्या संकुचित मानसिकतेचे उदाहरण म्हटले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com