'हमारा बजाज' चेतक पुन्हा रस्त्यावर धावणार!

टीम ई-सकाळ
बुधवार, 16 ऑक्टोबर 2019

येत्या जानेवारी 2020 पासून इलेक्ट्रिक चेतक स्कूटरच्या विक्रीस पुण्यातून सुरवात होणार असून त्यानंतर बंगळूरमध्ये विक्री सुरू करण्याची कंपनीची योजना आहे.

दुचाकी वाहन क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या बजाज कंपनीने आपली आयकॉनिक स्कूटर ब्रँड 'चेतक'ला इलेक्ट्रिक अवतारामध्ये परत आणली आहे. 

रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, नीति आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत आणि बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांच्या उपस्थितीत ई-स्कूटर चेतकचे अनावरण करण्यात आले. 

- आदित्य ठाकरेंबद्दल काय म्हणतोय संजूबाबा?

यावेळी बजाज म्हणाले की, 'दुचाकी उद्योग क्षेत्रात प्रस्थापित झालेल्या बजाज कंपनीने अनेक गोष्टी पहिल्यांदा स्वत: निर्माण केल्या आहेत. त्यामुळेच आम्ही इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातही जाण्याचा निर्णय घेतला आहे.'  

- अयोध्या प्रकरणाची सुनावणी पूर्ण; निकाल ठेवला राखून!

येत्या जानेवारी 2020 पासून इलेक्ट्रिक चेतक स्कूटरच्या विक्रीस पुण्यातून सुरवात होणार असून त्यानंतर बंगळूरमध्ये विक्री सुरू करण्याची कंपनीची योजना आहे. बजाजच्या चाकण येथील प्लांटमधून सुरवातीस विक्री केली जाईल. त्यानंतर प्रो-बाइकिंग डीलरशिप कंपनी सुरू करणार आहे. पुढील वर्षी युरोपच्या बाजार पेठांमध्ये चेतक विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. 

- Realme X2 Pro : 64 मेगापिक्सेल कॅमेरा असलेला स्मार्टफोन लॉन्च

अशी आहे इलेक्ट्रिक स्कूटर 'चेतक'? 

बजाजने नवीन चेतक स्कूटरची किंमत अजून जाहीर केलेली नाही. मात्र, या नव्या स्कूटरची किंमत दीड लाख रुपयांपेक्षा जास्त नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले. स्पोर्टमोडमध्ये 85 किमी आणि इको मोडवर 95 किमीपर्यंत ती धावू शकते. तसेच एकदा चार्ज केल्यानंतर 5 तासांपर्यंत ती कार्यरत राहत असल्याची माहिती कंपनीने दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hamara Bajaj is back with electric scooter Chetak