Video : 2020 चे स्वागत करताना हवाई दल म्हणतेय 'How's the Josh'

वृत्तसंस्था
बुधवार, 1 जानेवारी 2020

भारतीय हवाई दलाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. 

नवी दिल्ली : जगभरात सगळीकडे नवनवर्षाचा उत्साह आहे. संपूर्ण देशातही प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने नववर्षाचे स्वागत करत आहे. अशात भारतीय हवाई दलानेसुद्धा देशवासीयांना अनोख्या पद्धतीने नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भारतीय हवाई दलाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. 

#HappyNew2020 : जगभरात नववर्षाचं जल्लोषात स्वागत

''छोटंस वादळ पाहून तुम्ही घाबरु शकता पण आमच्यासाठी नसानसात भिनलेल्या देशभक्तीसमोर हे वादळ काहीच नाही. जेव्हा मी देशासाठी लढत असेन तेव्हा माझ्या चेहऱ्यावर अभिमानाचे स्मितहास्य आणि शत्रूला संपविण्याची जिद्द असेन. मी भारीतय वायू सेनेचा योद्धा आहे आणि मृत्यूला चकवा देणं माझा स्वभाव आहे. गरुडाप्रमाणे उंच आकाशात भरारी घेणं ही माझी सवय आहे. शूत्रांना चोख प्रत्युत्तर देणं माझ्या जिवाला शांत करतं. भारतीय वायू सेनेचा गणवेश चढविल्यावर माझी छाती अभिमानाने फुलते. जेव्हा आम्ही उंच आकाशात जातो तेव्हा आमची नजर गरुडासारखी, छाती सिंहासारखी, विमानाची चाल पुष्पकसारखी तर निश्चय हिमालयासारखा भक्कम हवा. माझं मन एकच सांगत राहतं, नभ: स्पृशं दीप्तम. हवाई दलाकडून सर्व भारतीयांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Happy New 2020 Indian Air Force wishes all a very Happy New Year