esakal | हरभजन सिंगने केला 100 नंबरवर फोन अन् म्हणाला...
sakal

बोलून बातमी शोधा

harbhajan singh arrested threatening kill narendra modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारणार असल्याची धमकी 100 नंबरवर फोन करून दिली. पोलिसांनी संबंधित युवकाला ताब्यात घेतले असून, त्याचे नाव हरभजन सिंग आहे. पण, तो क्रिकेटपटू हरभजन सिंग नाही.

हरभजन सिंगने केला 100 नंबरवर फोन अन् म्हणाला...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारणार असल्याची धमकी 100 नंबरवर फोन करून दिली. पोलिसांनी संबंधित युवकाला ताब्यात घेतले असून, त्याचे नाव हरभजन सिंग आहे. पण, तो क्रिकेटपटू हरभजन सिंग नाही.

दुचाकीवर बसलेली असताना रोडरोमिओ आले अन्...

हरियाणा येथील रहिवासी असलेला हरभजन सिंग नोकरीनिमित्त नोएडा सेक्टर 66 मध्ये राहात आहे. लॉकडाऊनच्या काळात त्याची नोकरी गेली. यामुळे तो नैराष्यात आहे. लखनौ कंट्रोल रुमला फोन करुन त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याची धमकी दिली. त्यामुळे शासन व प्रशासनात खळबळ उडाली होती. पोलिसांनी तत्काळ सुत्रे हलवत हरभजन सिंगला ताब्यात घेतले. यावेळी तो नशेत होता. चौकशीदरम्यान तो ड्रग्ज अॅडिक्टेड असल्याचे पोलिसांना समजले.

Video: शानदार झेल घेणारी मांजर व्हायरल...

अतिरिक्त पोलिस उपायुक्त अंकुर अग्रवाल यांनी सांगितले की, 'हरभजन सिंग याने 100 नंबरवर फोन करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारणार असल्याची धमकी दिली होती. त्यानंतर, स्थानिक विभागातील फेज ३ च्या पोलिसांनी तत्काळ घटनेचा तपास सुरु केला. पोलिसांनी या युवकाचा तपास करून मामुरा परिसरातून अटक केली. नशेत असल्यामुळे त्याला वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.'