वयाच्या 65 व्या वर्षी हरिश साळवे करणार दुसरं लग्न

सकाळ वृत्तसेवा
Monday, 26 October 2020

गेल्याच महिन्यात साळवे यांनी त्यांची पहिली पत्नी मीनाक्षी यांच्यापासून घटस्फोट घेतला होता. हरिश आणि मीनाक्षी यांचा संसार 38 वर्षांचा होता. त्यांना दोन मुलीसुद्धा आहेत.

नवी दिल्ली - माजी सॉलिसिटर जनरल हरिश साळवे वयाच्या 65 व्या वर्षी दुसऱ्यांदा लग्न करणार आहेत. देशातील नामांकित वकिलांपैकी एक अससेले हरिश साळवे हे ब्रिटनमध्ये क्वीन्स कौन्सिल आहेत. गेल्याच महिन्यात साळवे यांनी त्यांची पहिली पत्नी मीनाक्षी यांच्यापासून घटस्फोट घेतला होता. हरिश आणि मीनाक्षी यांचा संसार 38 वर्षांचा होता. त्यांना दोन मुलीसुद्धा आहेत.

हरिश साळवे येत्या 27 ऑक्टोबर रोजी लंडनमध्ये विवाहबद्ध होणार आहेत. ख्रिस्ती मैत्रिण कॅरोलिन ब्रॉजर्स हिच्यासोबत लग्न करण्याआधी हरिश साळवे यांनी धर्मही बदलला आहे. गेल्या दोन वर्षांपासून हरिश साळवे कॅरोलिनसोबत उत्तर लंडनमधील चर्चमध्ये जात होते. दोघांचेही हे दुसरे लग्न आहे. कॅरोलिन 56 वर्षांच्या असून त्यांना एक मुलगीसुद्धा आहे.

हरिश साळवे हे भारतातील प्रसिद्ध वकिल असून त्यांना भारत सरकारनं सॉलिसिटर जनरल म्हणून नियुक्त केलं होतं. 2019 मध्ये त्यांनी पाकच्या ताब्यात असलेल्या भारताच्या कुलभूषण जाधव यांची बाजू आंतरराष्ट्रीय न्यायालयात मांडली होती. यामध्ये त्यांनी पाकला तोंडावर पाडलं होतं. इतकंच नाही तर या प्रकरणासाठी त्यांनी शुल्क म्हणून फक्त एक रुपया घेतला होता. 

हे वाचा - मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ यांना झटका, काँग्रेस आमदाराचा भाजपमध्ये प्रवेश

महाराष्ट्रातील नागपूरमध्ये शिक्षण घेतलेले हरिश साळवे 1976 मध्ये दिल्लीला आले. सध्याचे सरन्यायाधीश शरद अरविंद बोबडे यांच्यासोबतच हरिश साळवे यांचे शालेय शिक्षण झाले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: harish salve will marry 27 october in london church