भारताची स्थिती अमेरिकेपेक्षा चांगली

Coronavirus
Coronavirus

नवी दिल्ली - कोरोना महासाथीवर मात करून म्हणजेच बरे होऊन परतणाऱ्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येबाबत भारताची स्थिती अमेरिकेपेक्षा २० पटींनी चांगली असल्याचे सरकारतर्फे मंगळवारी सांगण्यात आले. देशातील मृत्यू दर तीन टक्‍क्‍यांच्या आसपास स्थिर राहिलेला आहे.

देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा, मे महिना सुरू झाला तेव्हापासून दरदिवशी विक्रमी संख्येने वाढत एक लाखांवर गेला असला तरी आरोग्य मंत्रालयासह काही संस्थांनीदेखील यातील सकारात्मक बाजू समोर आणणे सुरू ठेवले आहे. निती आयोगाने आज याबाबत काही ट्विट केली. अमेरिकेत जेव्हा रुग्णसंख्या एक लाख होती तेव्हा बरे होणाऱ्यांची संख्या केवळ दोन  टक्के होती. भारतात आता रुग्णसंख्येने एक लाखाचा टप्पा ओलांडला असताना हेच प्रमाण ४० टक्के इतके आहे.

भारताने लॉकडाउनसारखे उपाय योग्य वेळी केले. लोकसंख्या प्रचंड असली व आरोग्य सुविधांना मर्यादा असल्या तरी लोकांमध्ये स्वच्छतेबाबत आणि कोरोना प्रतिकाराबाबत चांगल्यापैकी जनजागृती झाली आणि आरोग्य सुविधा अधिक मजबूत करण्यासाठी २४ मार्चपासून पुढचा महिनाभराचा लॉकडाउनचा कालावधी उपयोगी आला, हे काही मुद्दे जगभरात चर्चिले जातात. भारतात युवकांची संख्या तुलनेने जास्त आहे आणि कोरोनासारख्या घातक विषाणूबरोबर लढण्यासाठी जी  शारीरिक प्रतिकारशक्ती हवी ती त्यांच्याकडे सर्वाधिक आहे .भारताच्या कोरोना लढाईच्या आत्तापर्यंतच्या चांगल्या कामगिरीचे हेदेखील गमक मानले जाते.

निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकार अमिताभ कांत यांनी ही माहिती ट्विट करून सांगितले की जगाच्या अनेक प्रगत देशांच्या तुलनेत कोरोनाशी लढाई करण्यात भारत अजूनही चांगल्या स्थितीत आहे. भारताचा तुलनात्मक विचार केला तर एकूण रुग्णांच्या संख्येतील १० लाख लोकांमागे मृत्युमुखी पडणाऱ्या रुग्णांची संख्या केवळ दोन इतके आहे. हीच संख्या अमेरिकेत २७५ आणि स्पेनमध्ये ५९१ आहे.

बरे होणाऱ्या रुग्णांची टक्केवारी
अमेरिका २ 
रशिया ११
इटली १४ 
तुर्कस्थान  १८ 
फ्रान्स २१
स्पेन २२
जर्मनी २९
भारत ४० टक्के

एक लाख रुग्णांच्या मागे मृत्युमुखी पडणाऱ्यांची तुलनात्मक आकडेवारी  
रशिया  १०७३, 
जर्मनी १५८४, 
अमेरिका २११०, 
तुर्कस्थान २४९१, 
भारत ३१६३, 
ब्राजील  ७०२५, 
स्पेन ९३८७, 
फ्रान्स १०८६९, 
इटली ११५९१

संपूर्ण इमारत सील करू नये
दिल्लीमध्ये एखाद्या मंत्रालयातील हजारो कर्मचाऱ्यांपैकी केवळ एक-दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले तर त्या मंत्रालयाची संपूर्ण इमारत सील वा कामासाठी बंद करू नये, असे दिशानिर्देश आरोग्य मंत्रालयाने दिले आहेत. अलीकडेच राजीव गांधी विमान वाहतूक मंत्रालयासह शास्त्री भवन, रेल्वे भवन, कृषी भवन आधी मंत्रालयाच्या इमारती कोरोना रुग्ण आढळल्यावर काही दिवसांसाठी बंद करण्यात आल्या होत्या.ज्या मंत्रालयामधील ज्या मजल्यावर किंवा भागामध्ये कोरोनाचे रुग्ण सापडतील केवळ तेवढाच भाग यावा अशा सूचना सरकारने आता दिल्या आहेत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com