Hathras: 'आम्ही निर्दोष, पीडितेला आई आणि भावानेच मारलं'

सकाळ ऑनलाईन टीम
Thursday, 8 October 2020

उत्तर प्रदेशातील हाथरस प्रकरणाबद्दल रोज नवीन माहिती समोर येत आहे. सामुहिक बलात्कारातील मुख्य संशयित आरोपी असलेले संदीप ठाकूरने पोलीस अधिक्षकांना एक पत्र लिहले आहे

हाथरस : उत्तर प्रदेशातील हाथरस प्रकरणाबद्दल रोज नवीन माहिती समोर येत आहे. सामुहिक बलात्कारातील मुख्य संशयित आरोपी असलेले संदीप ठाकूरने पोलीस अधिक्षकांना एक पत्र लिहले आहे. यामध्ये संदीपने पीडिता ही त्याची मैत्रिण होती, असं सांगितलं आहे.

 पोलीसांना लिहलेल्या पत्रात पीडितेला तिच्या कुंटुंबानेच मारलं असल्याचा दावा केला आहे. ' आम्ही दोघं 14 सप्टेंबरला शेतात भटलो होतो. त्यावेळेस पीडितेची आई आणि भाऊ तिथेच होते. त्यावेळी पीडितेने मला तिथून निघून जायला सांगितलं होतं. त्यानंतर तिच्या आई आणि भावाने तिला खूप मारलं होतं' असं पत्र आरोपी संदीप याने लिहलं आहे.

हेही वाचा - ना घर का, ना घाट का; गुप्तेश्वर पांडेंना JDU ने तिकिट नाकारलं​

संदीपने पत्रात सांगितलं आहे की, 'पीडिता आणि त्याच्यात चांगली मैत्री होती. तो पीडितेला भेटायचा तसेच तिच्याशी फोनवरही बोलत होता. परंतू ही गोष्ट पीडितेच्या कुटुंबाला आवडत नव्हती. घटनेच्या दिवशी आमच्या दोघांची शेतात भेट झाली होती. पण नंतर मला तिथून जायला सांगितल्यावर मी घरी निघून गेलो होतो. त्यानंतर मला गावातील लोकांकडून समजलं की पीडितेला तिच्या आईने आणि भावाने खूप मारलं आहे. त्यानंतर पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.'

संदीपने पत्रात स्वतःसह त्याचे तीन मित्र निर्दोष आहेत असं म्हटलं आहे. तसेच संदीपने पीडितेची आई आणि तिच्या भावावर खोटे बोलल्याचे आरोपही लावले आहेत. आरोपींच्या कुटुंबाने त्यांची मुले जेलमध्ये सुरक्षित नसल्याचं सांगितलं आहे. जेलमध्ये पोलीस जरी असले तरी त्यांच्या मुलांना जेलमध्ये धोका असल्याचा दावा आरोपींच्या कुटुंबाने केला आहे. 

हेही वाचा - भाजप नेत्यांची ‘एलजेपी’त आवक; चिराग पासवान यांना साथ

यापुर्वी हाथरस प्रकरणावर धक्कादायक खुलासा समोर आला होता. एसआयटीच्या तपासात आरोपी संदीप याच्या फोनवरून पीडितेच्या भावाच्या मोबाईलवर वारंवार बोलणं झाल्याचे उघड झालं होतं. ऑक्टोबर 2019 पासून मार्च 2020 पर्यंत दोन्ही फोनमध्ये 104 कॉल झालेली आहेत. ज्यातील 62 कॉल आरोपी संदीपच्या फोनवर आलेले असून 42 पीडितेच्या भावाच्या मोबाईलवर गेले होते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hathras accused Sandeep wrote to SP The victim was killed by mother and brother