संतापजनक! हाथरस 'निर्भया'चा मृतदेह कुटुंबियांकडे न सोपवता पोलिसांनीच केले अंत्यसंस्कार

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 30 September 2020

पीडीतेवर करण्यात आलेले दुष्कर्म हे इतके भयानक आहेत की ते माणूसकीला काळीमा फासणारे आहेत. मात्र, अशातच आणखी एक धक्कादायक बाब या प्रकरणासंदर्भात समोर आली आहे.

हाथरस : उत्तर प्रदेशातील हाथरस या गावात झालेली सामूहिक बलात्काराने पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा  प्रश्न ऐरणीवर आला आहे. या क्रूर घटनेने भारतातील महिला या सुरक्षित नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. पीडीतेवर करण्यात आलेले दुष्कर्म हे इतके भयानक आहेत की ते माणूसकीला काळीमा फासणारे आहेत. मात्र, अशातच आणखी एक धक्कादायक बाब या प्रकरणासंदर्भात समोर आली आहे. 

उत्तरप्रदेशातील या पीडीतेला उपचारांसाठी दिल्लीला नेण्यात आलं होतं. तिथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतर पोलिसांनी तीचा मृतदेह परिवाराकडे सुपुर्द न करता त्यावर कोणत्याही रितीरिवाजाशिवाय त्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. पोलिसांनी केलेल्या या कृत्याबद्दल संताप व्यक्त होत आहे. 

याआधी जेव्हा मृतदेह गावात आणला गेला तेंव्हा तो कुटुंबियांकडे सोपवला गेला नाही. कुटुंबियांनी अक्षरश: ऍम्ब्यूलन्ससमोर पडून आपला आक्रोश व्यक्त केला. यादरम्यानच एसडीएमवर कुटुंबियांसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप लावला गेला. यानंतर पोलिस आणि गावकऱ्यांमध्ये झटापटी झाली. 

हेही वाचा - आणखी एका युवतीला मारले: राहुल गांधी

कुंटुबिय रात्री अंत्यसंस्कार करु इच्छित नव्हते, मात्र, पोलिसांना तातडीनं अंत्यसंस्कार करायचे होते. त्यामुळेच अर्ध्या रात्री म्हणजेच, 2:40च्या दरम्यान कोणत्याही रितीरिवाजाशिवाय आणि कुंटुंबियांच्या उपस्थितीशिवाय पीडीतेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

मृतदेहाचा चेहराही पाहू दिला नाही.
पीडीतेचे काका भूरी सिंह यांनी सांगितलं की, अत्यंसंस्कारासाठी पोलिस दबाव टाकत होती. पीडीतेचे आई-वडिल आणि भाऊ कोणीही इथे उपस्थित नाही. ते अजूनही दिल्लीतच आहेत. रात्री अंत्यसंस्कार नको तसेच कुंटुंबियांच्या येण्याची वाट पाहुया, अशी विनंती करुनही पोलिसांनी दबाव टाकला की, जर तुम्ही नाही केलं तर आम्ही अंत्यसंस्कार करु. 

हेही वाचा - बिहारचा रणसंग्राम : चर्चेनंतरही तिढा कायम

देशभरातून संताप व्यक्त 
पीडीतेच्या मृत्यूनंतर सर्वच राजकीय पक्षांनी सरकारवर निशाना साधला आहे. देशभरातून संताप व्यक्त होतो आहे. भीम आर्मीने सफदरजंग हॉस्पिटलमध्ये जाऊन धरणे आंदोलनही सुरु केले आहे. समाजवादी पार्टी. बसपा आणि काँग्रेसनेही याप्रकरणी टिका केली आहे. उत्तर प्रदेशात अनेक जिल्ह्यात लोकांनी पीडीतेच्या न्यायासाठी कँडल मार्च काढला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hathras case police performs last rites without permission of family