मुलांना लस देण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांनी ३ हिमनद्या ओलांडल्या!

मुलांना लस देण्यासाठी तब्बल ३ हिमनद्या ओलांडल्या! आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कर्तृत्वाची देशभरात चर्चा
glacier
glacieresakal

हातात लसीची पेटी.. अवतीभवती फक्त बर्फ आणि बर्फ... तासंतास पायी चालल्यानंतर आरोग्य कर्मचाऱ्यांची (Health Department Teams) टीम बडग्रानला पोहोचली खरी. पण आश्चर्य म्हणजे किशोरवयीन मुलांना कोरोनाची लस देण्यासाठी अत्यंत कठोर परिस्थितीत या टीमला तीन हिमनद्याही पार कराव्या लागल्या. (40 Kilometer Cross Glaciers For Vaccination Of Children) वाचा सविस्तर..

मुलांना लस देण्यासाठी 40 किमी बर्फातून चालत प्रवास

भरमौरचे आरोग्य अधिकारी डॉ. अंकित मंडला यांनी सांगितले की, भरमौर ते बडग्रानकडे जाणारे हे आरोग्य पथक 40 किमी बर्फात चालत प्रवास करीत आहे. भरमौरमधून बाहेर पडलेला आरोग्य कर्मचाऱ्यांचा चमू तीन दिवसांपासून बडग्रानमध्ये अडकला आहे. भरमौरहून सकाळी निघालेली टीम संध्याकाळी उशिरा बडग्रानला पोहोचली. शाळेला सुटी असल्याने या दिवसांत मुले घरीच असल्याने या पथकाने गावकऱ्यांना लसीकरणासाठी मुलांना एकाच ठिकाणी आणण्यास सांगितले. यानंतर शाळेजवळील गावातील मुलांना लसीकरण करण्यात आले, या लसीकरणा दरम्यान दुर्गम भागातील मुलांना बोलावले जात आहे. यामुळे हा चमू सध्या तेथेच थांबला आहे. आरोग्य कर्मचारी दिलीप कुमार आणि शिक्षण विभागाचे कर्मचारी १५ ते १८ वयोगटातील किशोरवयीन मुलांकडे लसीकरण करण्यासाठी गेले आहेत.

glacier
PM मोदींच्या घोषणेने नेपाळचा संताप, काम बंद करण्यास सांगितले

हिमनद्या ओलांडतानाचा व्हिडिओ व्हायरल

भरमौर ते बडग्रान या आदिवासी भागातून 40 किमी बर्फात प्रवास केल्यानंतर आरोग्य विभागाच्या पथकाने किशोरवयीन मुलांचे लसीकरण केले. लसीकरणासाठी प्रवास करताना एक सदस्य बर्फात घसरला तर दुसरा त्याची काळजी घेत असे. आरोग्य कर्मचाऱ्यांचा बर्फाच्छादित हिमनदी ओलांडतानाचा व्हिडिओ आरोग्य विभागाने सोशल मीडिया ग्रुपवर शेअर केला आहे.

glacier
पंजाबच्या निवडणुका पुढे ढकलणार? निवडणूक आयोगाची बैठक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com