प्रत्येक लोकसभा मतदारसंघात आता 'हेल्दी फूड स्ट्रीट'; आरोग्य मंत्रालयाचा विचार सुरु

केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील कँटिनमध्ये मिळणार केवळ पौष्टिक पदार्थ. या पार्श्वभूमीवरच आता 'हेल्दी स्ट्रीट फूड' योजनेचा विचार सुरु
Healthy Food Street_Mansukh Mandviya
Healthy Food Street_Mansukh Mandviya

नवी दिल्ली : देशातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघात 'हेल्दी फूड स्ट्रीट' (Street Food) तयार करण्याच्या योजनेवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून विचार सुरु आहे. समोसा, वडापाव (Samosa-Vadapav) यांसारख्या तळलेल्या पदार्थांऐवजी लोकांच्या खानपानाच्या सवयींमध्ये बदल होऊन त्यांना पौष्टिक पदार्थ खायची सवय व्हावी, या उद्देशानं हा उपक्रम राबवण्याचा आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय (Mansukh Mandviya) यांचा विचार आहे. डीडी न्यूजनं यासंदर्भात वृत्त दिलंय. (Healthy Food Street now in every Lok Sabha constituency Ministry of Health thinking over it)

कोरोनाच्या संकटामध्ये 'इम्युनिटी' हा खूपच मोठा विषय बनला आहे. याचाचं पुढचं पाऊल म्हणून दिल्लीतील केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील कँटिनकडं पहायला हवं. कारण या कँटिनमध्ये आता केवळ पौष्टिक पदार्थच खायला मिळणार आहेत, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी हा निर्णय घेतला आहे. यामुळं आता आरोग्य मंत्र्यांच्या या कँटिनला आता हेल्दी कँटिन म्हणून संबोधलं जात आहे. या कँटिनमधून आता समोसा, भजी यांसारखे तळलेले पदार्थ हद्दपार करण्यात आले आहेत. बऱ्याच काळानंतर मंत्रालयातील या कँटिनच्या मेन्यूमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. या मेन्यूनुसार आता इथं सर्वकाही सकस आणि पौष्टिक पदार्थ मिळणार आहेत.

आरोग्य मंत्रालयाच्या कँटिनमध्ये मिळणार 'हे' पौष्टिक पदार्थ

या पौष्टिक पदार्थांमध्ये बाजरीची खिचडी, रागीचा (मोठी डाळ) शिरा, पोहे, तांदळाचा ढोकळा, गुजराती कढी, मिक्स व्हेजिटेबल राजमा आणि याहून अधिक पौष्टिक पदार्थ मिळणार आहेत. यामध्ये विविध धान्याच्या पाच प्रकारच्या खिचडींचाही समावेश आहे. त्याचबरोबर बटाटे वड्याऐवजी केळीचा वडाही या ठिकाणी मेन्यूकार्डमध्ये उपलब्ध आहे.

Healthy Food Street_Mansukh Mandviya
"वेट अँड वॉच"; मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर राऊतांचा विरोधकांना इशारा

या मंत्रालयाच्या कँटिमध्ये जे पदार्थ मिळतात ते इतर कुठल्याही मंत्रालयाच्या कँटिनमध्ये मिळत नाहीत. विशेष म्हणजे मंत्रालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी हे अगदी माफत दरात उपलब्ध असणार आहेत. यानंतर आता दुसऱ्या मंत्रालयांमध्ये देखील हा मेन्यू उपलब्ध करुन देण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे. स्वतः केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय हे देखील या कँटिनमध्ये जेवण करतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com