"वेट अँड वॉच"; मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर राऊतांचा विरोधकांना इशारा

शिवसेना आणि महाविकास आघाडी कागदपत्रांच्याबाबतीत पक्के आहोत, असंही राऊत यावेळी म्हणाले.
sanjay raut on Sudhir Joshi
sanjay raut on Sudhir Joshi sanjay raut

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची भेट घेतल्यानंतर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेना (ShivSena) आणि महाविकास आघाडी (MVA) कागदपत्रांच्याबाबतीत पक्के आहोत, असं सांगताना 'वेट अँड वॉच' अशा शब्दांत विरोधकांना इशारा दिला. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुधीर जोशी (Sudhir Joshi) यांच्या निधनावर प्रतिक्रिया देताना ते माध्यमांशी बोलत होते. (Wait and Watch Sanjay Raut warns opposition after CM Uddhav Thackeray visit)

sanjay raut on Sudhir Joshi
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुधीर जोशी यांचं 81व्या वर्षी निधन

राऊत म्हणाले, "मुख्यमंत्र्यांना मी नेहमीच भेटतो. आजच्या भेटीत आमची राज्याच्या राजकारणावर चर्चा झाली. विरोधकांवरील आरोपींच्या फाईलींबाबत बोलताना राऊत म्हणाले, शिवसेना आणि महाविकास आघाडी कागदपत्रांबाबत पक्के आहोत. वेट अँड वॉच"

अनमोल हिरा, आंदोलनातील तळपती तलवार गमावली

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुधीर जोशी यांचं गुरुवारी ८१ व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या निधनावर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले, सुधीर जोशींसारखा एक अनमोल हिरा आणि आमच्या आंदोलनातील तळपती तलवार आम्ही गमावली. शिवसेनेच्या अनेक कार्यक्रमांना त्यांनी मार्गदर्शन केल. तरुणपणात त्यांनी मुंबईचं महापौपद भूषवलं आणि महापौर कसा असावा हे आम्ही त्यांच्याकडून शिकलो. त्यांचं सर्वात मोठं काम काय असेल तर त्यांनी शिवसेनेचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी लोकाधिकार समितीचं काम सुरु केलं. याद्वारे भूमिपुत्रांना बँका, विमा कंपन्या, सार्वजिनक क्षेत्र, एअर इंडिया अशा अनेक सरकारी उपक्रमांमध्ये मराठी तरुणांना नोकऱ्या मिळाव्यात प्रशिक्षण मिळावं यासाठी प्रयत्न केले.

sanjay raut on Sudhir Joshi
शीख जवानांसाठी खास 'वीर' हेल्मेट विकसित; अशी आहेत सुरक्षा फिचर्स

त्याचं हे भूमिपुत्रांच्या आंदोलनाचं मॉडेल पुढे देशभरात वापरलं गेलं. पण सुधीर जोशींनी शिवसेनेची अंगीकृत संघटना म्हणून या कार्याची मुहूर्तमेढ रोवली. यामाध्यमातून मोठ्या प्रामाणावरील तरुण वर्ग शिवसेनेशी कायमचा जोडला गेला. आजही लोकाधिकार समिती ही शिवसेनेची सर्वात मोठी ताकद आहे. सुधीर जोशी यांनी अनेक आंदोलनांचं नेतृत्व केलं. ते उत्तम वक्ते, मितभाषी होते. शिवसैनिक म्हणून त्यांचा रुद्रावतार, त्यांची चपळाई त्यांचा संघर्ष, अफाट वाचन, बुद्धिमत्ता, स्मरणशक्ती यामध्ये भल्या भल्यांना ते थक्क करत असतं. त्यांनी राज्याचे महसूल मंत्री, शिक्षण मंत्री आणि अनेक पदांवर त्यांनी काम केलं. पण दुर्देवानं त्यांचा एक अपघात झाला त्यानंतर त्यांना बराच काळ घरी रहावं लागलं. सुधीर जोशी आमच्या सर्व शिवसैनिकांच्या कायम लक्षात राहतील, अशा शब्दांत राऊत यांनी सुधीर जोशींच्या आठवणींना उजाळा दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com