देवेंद्र फडणवीसांच्या याचिकेबाबत सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी

Devendra-Fadnavis
Devendra-Fadnavis

नवी दिल्ली - माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ च्या निवडणुकीप्रसंगी उमेदवारी अर्ज सादर करताना त्यांच्या विरोधातील दोन प्रलंबित गुन्हेगारी स्वरूपाच्या तक्रारींचा तपशील दडविल्याप्रकरणी त्यांना खटल्याला सामोरे जावे लागण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. फडणवीस यांनी या निकालाच्या अनुषंगाने फेरविचार करावा, अशी मागणी करणारी याचिका न्यायालयात सादर केली होती, त्यावर न्यायालयाने आज खुली सुनावणी घेण्याची तयारी दर्शविली आहे.

फडणवीसांच्या याचिकेवर खुली सुनावणी घेण्यास आम्ही मान्यता देतो, असे आदेश न्या. अरुण मिश्रा, न्या. दीपक गुप्ता आणि न्या. अनिरुद्ध बोस यांच्या खंडपीठाने आज दिले. सर्वोच्च न्यायालयाने १ आक्‍टोबर २०१९ रोजी मुंबई उच्च न्यायालयाने फडणवीस यांना दिलेली क्‍लीन चिट रद्दबातल ठरविली होती. तसेच या गुन्ह्यामध्ये त्यांच्या विरोधात लोकप्रतिनिधी कायद्यान्वये खटला चालविला जाऊ शकत नाही, असे म्हटले होते.

देवेंद्र फडणवीस यांच्या पुनर्विचार याचिकेवर खुली सुनावणी घेण्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. यामुळे या खटल्याच्या गुणदोषांवर सुनावणी होईल.
- ॲड. निशांत काटनेश्‍वरकर, महाराष्ट्राचे माजी सरकारी वकील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com