लैंगिक शोषण प्रकरण : शिवमूर्ती मुरुगा स्वामींच्या जामीन अर्जावरील सुनावणी कोर्टानं पुढं ढकलली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shivamurthy Muruga Swamy

चित्रदुर्ग मठाचे महंत शिवमूर्ती मुरुगा हे लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली पोलिसांच्या ताब्यात आहेत.

लैंगिक शोषण प्रकरण : शिवमूर्ती मुरुगा स्वामींच्या जामीन अर्जावरील सुनावणी कोर्टानं पुढं ढकलली

बंगळुरु (कर्नाटक) : लैंगिक शोषण प्रकरणी अटक करण्यात आलेल्या चित्रदुर्गमधील (Karnataka Chitradurga) मुरुगा मठातील शिवमूर्ती मुरुगा स्वामी (Shivamurthy Muruga Swamy) यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवरील सुनावणी पुढं ढकलण्यात आलीय. या प्रकरणातील चारही आरोपींनी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यापूर्वी न्यायालयानं राज्य सरकारी वकिलांना आक्षेप नोंदवण्यासाठी सोमवारपर्यंतची मुदत दिलीय.

लिंगायत मठाचे संत आणि प्राचीन चित्रदुर्ग मठाचे महंत शिवमूर्ती मुरुगा हे लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली पोलिसांच्या ताब्यात आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संतानं वैद्यकीय कारणाचा हवाला देत चित्रदुर्ग येथील जिल्हा सत्र न्यायालयात (Chitradurga District Sessions Court) अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. शनिवारी न्यायालयानं यावरील सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब केलीय. याप्रकरणी संत मुरुगा शरनारू यांची चित्रदुर्ग जिल्ह्यातील डीएसपी कार्यालयात चौकशी सुरूय.

हेही वाचा: Karni Sena : करणी सेनेच्या नगर मंत्र्याची चाकूने भोसकून हत्या; 3 आरोपींना अटक

यापूर्वी शुक्रवारी जिल्हा सत्र न्यायालयानं मुरुगा मठाचे मुख्य महंत शिवमूर्ती मुरुगा शरनारू यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. न्यायालयानं त्यांना 5 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. संत मुरुगा यांना गुरुवारी कर्नाटक पोलिसांनी (Karnataka Police) दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक केलीय. यापूर्वी 30 ऑगस्टला चित्रदुर्ग येथील जिल्हा सत्र न्यायालयानं मुरुगा मठाच्या मुख्य महंताच्या अटकपूर्व जामीन अर्जावर 1 सप्टेंबरपर्यंत स्थगिती दिली होती. याप्रकरणी पोक्सो कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येत आहे.

हेही वाचा: Tribal Girls : राजस्थानच्या आदिवासी मुलींची महाराष्ट्र, गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात तस्करी

Web Title: Hearing On Shivamurthy Muruga Swamy Bail Plea Seer Postponed To Monday Chitradurga Sessions Court

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..