esakal | दिल्लीत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित
sakal

बोलून बातमी शोधा

rain update

दिल्लीत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत मुसळधार पावसाने जनजीवन आणि रस्ते वाहतूक विस्कळीत झाली असताना, शनिवारी या पावसाचा हवाई वाहतुकीलाही फटका बसलाय. दिल्लीच्या विमानतळावरून होणारी तीन उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. तसेच पाच विमाने विमानतळावर उतरणार होती. परंतु त्यांना अन्यत्र वळविण्यात आले आहे. दरम्यान, नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी विमानतळावर साचलेले अर्धातासात दूर केल्याचे स्पष्ट केले आहे.

हेही वाचा: गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा राजीनामा

गेले काही दिवस दिल्लीत उकाडा वाढल्याने पावसाचा अंदाज व्यक्त केला जात होता. त्यानुसार शनिवारी पहाटेपासून जोरदार पावसाळा सुरवात झाली. दिल्ली शहर . दिल्ली एनसीआर आणि आजूबाजूच्या परिसरात पाण्याची तळी साचली. त्याचा वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल तीनवरील काही दर्शनी भाग पाण्याखाली गेला होता. दिल्लीत विमानतळावर येणारी विमानेही जयपूर आणि अहमदाबादकडे वळविण्यात आली आहेत. विमानतळासए एअरोसिटी परिसरातील रस्तेही पाण्याखाली गेले होते.

मुसळधार पावसाने साचलेल्या पाण्याची दखल विमानतळ प्राधिकरणाकडून लगेचच घेण्यात आली. दिल्लीत विमानतळावर येणारी चार आणि एक आंतरराष्ट्रीय विमान जयपूर तसेच अहमदाबादकडे वळविण्यात आले. पाणी हटविण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू करण्यात आले. सकाळी नऊ वाजता विमानतळांवरील कामकाज पूर्ववत झाल्याचे प्राधिकरणाने म्हटले आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांनीही फोटो आणि एक व्हिडिओ ट्विट केला असून, अर्धातासात पाणी हटविण्यात आल्याचे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

दिल्ली विमानतळासह दिल्लीतील अनेक भागांत प्रचंड पाणी साचले, अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेल्याचे चित्र होते. दुचाकी, रिक्षा आदी वाहने या पाण्यात बंद पडल्याने त्यांना लोटून नेण्याची वेळ नागरिकांवर आली. दिल्लीच्या इंडिया गेट, मिंटो रोड, आयटीओ, आर. के. पूरम, मोती बाग, पालम, द्वारका आणि मधूविहार या भागात अनेक ठिकाणी पाणी साचून होते.

हेही वाचा: PM मोदींच्या हस्ते 'सरदारधाम भवन'चे उद्‌घाटन

त्यामुळे काही ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली. धौला कुआं ते गुरुग्राम, आझादपूर ते मुबारका चौक यांसह द्वारका ते पालम आदी बहुतांश मार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती. त्यामुळे वाहतूक यंत्रणेला रस्त्यावर उतरून वाहतुकीला अन्य मार्गाने वळावावे लागत होते.

दिल्लीत गेल्या दिवसांपासून उकाडा होता. हवेतील आर्द्रता वाढल्याने दिल्लीकर घामाघूम होत होते. त्यात संततधार पावसाने किमान तापमान २५ अंश सेल्सियस नोंदले गेले. त्यामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या दिल्लीकरांना दिलासा मिळाला आहे.

loading image
go to top