Sri Sri Ravi Shankar : श्री श्री रविशंकर यांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचे इमरजन्सी लँडिंग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्री श्री रविशंकर

Sri Sri Ravi Shankar : श्री श्री रविशंकर यांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचे इमरजन्सी लँडिंग

Sri Sri Ravi Shankar : आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर आणि इतर चार जणांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचे इमरजन्सी लँडिंग करण्यात आले आहे.

हेही वाचा - 'नाटू नाटू..'ला मिळाला पुरस्कार..पण पुढे काय?

हेही वाचा: KL Rahul Athiya Shetty Marriage : लग्नात कोहलीनं दिलं 'विराट' गिफ्ट, तर, धोनीनं...

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार खराब हवामानामुळे रविशंकर यांच्या हेलिकॉप्टरचे इरोडमधील सत्यमंगलम येथे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.

बुधवारी सकाळी श्री श्री रविशंकर यांच्यासह चार जणांना घेऊन एक हेलिकॉप्टरने हवेत उड्डाण केले होते. मात्र, खराब हवामानामुळे तामिळनाडूच्या इरोड जिल्ह्यात या हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.

हेही वाचा: Lakhimpur Kheri : आरोपी आशिष मिश्राला SC कडून अटीशर्थींसह अंतरिम जामीन मंजूर

दरम्यान, रविशंकर आणि त्यांच्यासमवेत असलेले सर्वजण सुरक्षित असून, सुमारे 50 मिनिटांनी हवामान सुधारल्यानंतर हेलिकॉप्टरने पुन्हा उड्डाण घेतल्याचे सांगितले जात आहे.

कुठे निघाले होते श्री श्री रविशंकर

श्री श्री रविशंकर एका खाजगी हेलिकॉप्टरने बेंगळुरूहून तिरुपूरला निघाले होते. रविशंकर यांच्याशिवाय हेलिकॉप्टरमध्ये त्यांचे दोन सहाय्यक आणि पायलट प्रवास करत होते.

हेही वाचा: Kangana Ranaut On Twitter: कंगना ऑन फायर मोड! ट्विटरवर परताच बॉलिवूडवर निशाणा...

कदंबूरचे पोलीस निरीक्षक सी वादिवेल कुमार म्हणाले की, " श्री श्री रविशंकर यांच्या हेलिकॉप्टने सकाळी 10.15 वाजण्याच्या सुमारास तिरुपतीकडे उड्डाण केले होते. त्यावेळी अचानक तामिळनाडूच्या इरोड जिल्ह्यात खराब हवामानामुळे पायलटने हेलिकॉप्टरचे युकिनियम येथे इमर्जन्सी लँडिंग केले. सुमारे 50 मिनिटानंतर हवामान सुधारल्यानंतर हेलिकॉप्टरने पुन्हा तिरुपतीकडे उड्डाण केले.