Passport Index: भारताची पासपोर्ट रँकिंगमध्ये घसरण, शेजारी देश आहे पुढे; टॉपला कोण?

हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२४ ( Henley Passport Index 2024) जाहीर झाला आहे. या इंडेक्समध्ये फ्रान्सने पहिले स्थान मिळवलंय. ( India passport ranking has slipped)
Passport
Passport

नवी दिल्ली- हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२४ ( Henley Passport Index 2024) जाहीर झाला आहे. या इंडेक्समध्ये फ्रान्सने पहिले स्थान मिळवलंय. तर भारताचे स्थान मागील वर्षाच्या तुलनेत एक अंकाने घसरले आहे. २०२३ मध्ये भारत या इंडेक्समध्ये ८४ व्या स्थानी होता, तर यावर्षी तो ८५ व्या स्थानी आला आहे. (Henley Passport Index for 2024 France securing the top spot while India passport ranking has slipped one place 85th position)

हेनलेचा हा रिपोर्ट काहीसा आश्चर्यकारक आहे असं म्हणावं लागेल, कारण मागील वर्षापर्यंत भारतीय नागरिक ६० देशांमध्ये व्हिसा-फ्री प्रवास करु शकत होते. सध्या भारतीय नागरिक ६२ देशांमध्ये कोणत्याही व्हिसाशिवाय प्रवास करु शकतात. सध्या जगभरात भारतीय पासपोर्टला मान्यता मिळत असल्याचं चित्र आहे.

Passport
RBI Action: व्हिसा आणि मास्टरकार्डवर आरबीआयची मोठी कारवाई; ग्राहकांवर काय परिणाम होणार?

पासपोर्टच्या मजबुतीनुसार (विश्वासार्हता) हेनले पासपोर्ट इंडेक्स ठरवला जातो. २०२४ मध्ये फ्रान्सच्या पासपोर्टने बाजी मारली आहे. फ्रान्सच्या नागरिकांना १९४ देशांमध्ये व्हिसा-फ्री प्रवेश मिळतो. फ्रान्सशिवाय जर्मनी, इटली, जापान, सिंगापूर आणि स्पेन या देशांनी देखील अव्वल यादीमध्ये स्थान मिळवलं आहे.

मालदीव पुढे

पाकिस्तानने आपली स्थिती कायम ठेवली आहे. या यादीमध्ये पाकिस्तानचा क्रमांक १०६ वा आहे. तर बांगलादेशचे स्थानही एका अंकाने घसरले आहे. बांगलादेशचे स्थान १०१ वरुन १०२ वरती आले आहे. शेजारी मालदीवचे पासपोर्ट भारतापेक्षा अधिक मजबूत आहे. मालदीवचे स्थान या यादीत ५८ वे आहे. मालदीवच्या नागरिकांना ९६ देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवेश मिळतो.

Passport
शाहरुख खाननंतर आता क्रिती सेननलाही मिळाला UAE गोल्डन व्हिसा

इराण, मलेशिया, थायलंड या देशाने नुकतेच भारतीय नागरिकांना व्हिसा-फ्री प्रवेश देण्याचा निर्णय घेतलाय. असे असताना या यादीमध्ये भारताची घसरण झाली आहे. दरम्यान, हेनले पासपोर्ट इंडेक्स आंतरराष्ट्रीय एअर ट्रान्सपोर्ट असोसियशनच्या डेटाचा आधार घेऊन ही यादी जाहीर करते. यात १९९ देशांच्या पासपोर्टचा समावेश केला जातो. (Latest Marathi News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com