पोटात जोराची कळ, हायवेवर शौचालय दिसेना, गाडी पळवल्यानं मलाच ४ वेळा दंड झाला; न्यायमूर्तींनी NHAIला फटकारलं

High Court On NHAI : राष्ट्रीय महामार्गावर स्वच्छतागृहांची कमतरता आणि असलेल्या स्वच्छतागृहांमधील स्वच्छता यावरून केरळ हायकोर्टाने एनएचएआयला फटकारलंय. हायवेवरील स्वच्छतागृहांची जबाबदारी तुमची असल्याचं कोर्टाने म्हटलं.
Kerala High Court Slams NHAI Over Lack of Toilets on Highways

Kerala High Court Slams NHAI Over Lack of Toilets on Highways

ESakal

Updated on

राष्ट्रीय महामार्गावर भरावा लागणारा टोल, वेग मर्यादा ओलांडणे यामुळे दंडात्मक कारवाईसुद्धा होते. आता उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी टोल घेता, पावती फाडता पण स्वच्छ टॉयलेटची सुविधा देता येत नसल्यावरून नॅशनल हायवेज अथॉरिटी ऑफ इंडियाला फटकारलं आहे. केरळ उच्च न्यायालयाने म्हटलं की, एनएचएआयला महामार्गावर सार्वजनिक स्वच्छतागृहांची स्वच्छताही करता येत नाही. पेट्रोल पंपावर उपलब्ध असलेल्या स्वच्छतागृहांच्या वापराबाबत दाखल केलेल्या याचिकेवर केरळ हायकोर्टात सुनावणी झाली. यावेळी हायकोर्टानं महामार्गावर सोयीसुविधांचा अभाव असल्याच्या कारणावरून एनएचएआयचे कान टोचले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com