कोणतं आहे हे मंदिर, जिथे जायला लोक घाबरतात...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 नोव्हेंबर 2019

कुठल्याही मंदिरात जायचे म्हटले की सर्वजण खुश असतात. भारतात तर मंदिरांना खुपच महत्व आहे. सर्वच नागरिक भक्तीभावाने मंदिरात जातात. मात्र आपल्या देशात एक असेही आहे की, मंदिर ज्यामध्ये जायला सर्वच घाबरतात. हे मंदिर हिमाचल प्रदेशमध्ये आहे.

हिमाचल प्रदेश : कुठल्याही मंदिरात जायचे म्हटले की सर्वजण खुश असतात. भारतात तर मंदिरांना खुपच महत्व आहे. सर्वच नागरिक भक्तीभावाने मंदिरात जातात. मात्र आपल्या देशात एक असेही आहे की, मंदिर ज्यामध्ये जायला सर्वच घाबरतात. हे मंदिर हिमाचल प्रदेशमध्ये आहे.  

दरम्यान, तसे तर जगभरातील लोक त्यांच्या समस्या दूर करण्याची कामना घेऊन मंदिरांमध्ये जातात. पण या मंदिरात कुणीही जात नाही किंवा या मंदिरात जाण्यास लोक घाबरतात. आता या मंदिरात असं काय आहे की, लोक या मंदिरात जाण्यास घाबरतात? हे मंदिर आहे मृत्यूचा देव यमराजचं आहे. हेच कारण आहे की, लोक या मंदिराच्या शेजारून जायला देखील घाबरतात. हे जगातलं एकमेव असं मंदिर असेल जे यमराजाला समर्पित आहे. 

तसेच लाेक या मंदराबाबत म्हणतात की, या मंदिराला यमराजासाठी तयार करण्यात आलं आहे. त्यामुळे यात त्यांच्याशिवाय कुणीही प्रवेश करू शकत नाही. गोव्यातील लोक सांगतात की, या मंदिरात चित्रगुप्तसाठीही एक खास जागा तयार करण्यात आली आहे. यात ते मनुष्याच्या चांगल्या-वाईट कामांचा लेखाजोखा ठेवतात. असेल म्हटले जाते की, या मंदिरात चार छुपे दरवाजे आहेत आणि हे दरवाजे सोने, चांदी, तांबे आणि लोखंड या धातूंपासून तयार केलेले आहेत. असे मानले जाते की, जे लोक जास्त पाप करतात, त्यांची आत्मा लोखंडाच्या दरवाजाने आत जाते, तर ज्याने पुण्य केलंय त्यांची आत्मा सोन्याच्या दरवाज्यातून आत जाते.

या मंदिराला लोक धर्मेश्वर महावेद मंदिर, धरमराज मंदिर आणि यमराज मंदिर म्हणून ओळखतात. मुळात हिमाचलमध्ये अनेक प्रसिद्ध मंदिरे आहेत. हेही त्यांपैकी एक आहे. पण या इतर मंदिरांप्रमाणे या मंदिरात लोक जात नाही. ज्यांना नमस्कार करायचाय ते बाहेरूनच करतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Himachal pradesh people are afraid go temple

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: