esakal | समद्या गावाला झालीया कोरोनाची लागण; फक्त एकटा निगेटिव्ह
sakal

बोलून बातमी शोधा

corona

एक धक्कादायक अशी माहिती समोर असून अख्खं गावच कोरोनाबाधित झाल्यानं खळबळ उडाली आहे.

समद्या गावाला झालीया कोरोनाची लागण; फक्त एकटा निगेटिव्ह

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

धर्मशाळा - देशभरात कोरोनाचा उद्रेक वाढत चालला आहे. राजधानी दिल्ली सध्या तिसऱ्या लाटेचा सामना करत आहे. तर गुजरातमधील अहमदाबादमध्ये पुन्हा कर्फ्यू लागू केला आहे. यातच आता एक धक्कादायक अशी माहिती समोर असून अख्खं गावच कोरोनाबाधित झाल्यानं खळबळ उडाली आहे.

हिमाचल प्रदेशात असलेल्या लाहोल खोऱ्यातील थोरांग असं या गावाचं नाव असून या गावात केवळ एकच व्यक्ती कोरोनामुक्त आहे. भूषण ठाकूर असं त्या व्यक्तीच नाव आहे. लोकसंख्येचं प्रमाण पाहता लाहौल स्पिती हा जिल्हा राज्यातील सर्वाधिक कोरोनाबाधित असलेला जिल्हा ठरला आहे. 

कोरोनाबाधितांच्या संख्येत अचानक वाढ झाल्याने भागात पर्यटकांना येण्यास बंदी घातली आहे. रोहतांग बोगद्याच्या उत्तरेकडे हे गाव असून गुरुवारपासून पर्यटकांना प्रवेश बंद केला आहे. रोहतांग बोगद्यापासून पुढे असणाऱ्या गावांमध्ये पर्यटकांना मज्जाव करण्यात आला आहे. हा सर्व परिसर कंटेनमेंट झोन घोषित केला असल्याचं म्हटलं जात आहे. 

हे वाचा - Corona Vaccine: 'ऑक्सफर्डची लस एप्रिलमध्ये, दोन डोसची किंमत असणार 1000 रुपये'

थोरांग या गावातील लोक हिवाळा सुरु झाल्याने कुलू येथे स्थलांतरीत झाले आहेत. या गावची लोकसंख्या केवळ 42 इतकी आहे. भागात पर्यटकांची संख्या वाढल्यानं गावकऱ्यांची चाचणी करण्यात आली. त्यानंतर आलेल्या रिपोर्टमुळे सर्वांनाच धक्का बसला. गावातील 42 पैकी 41 लोकांना कोरोना झाल्याचं समोर आलं.

अख्ख्या गावाला कोरोना झाला तरी ज्या व्यक्तीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला त्या भूषण ठाकूर यांनी सांगितलं की, टेस्ट करण्याआधी आम्ही एकत्रच राहत होतो. त्यावेळी सॅनिटायझेशन, हात धुणं, मास्क घालणं, सोशल डिस्टन्सिंग पाळणं या गोष्टींचे पालन केले. कोरोनाला सहज न घेता लोकांनी काळजी घ्यायला हवी असंही त्यांनी म्हटलं. कुटुंबातील इतर पाच जणांना कोरोना झाल्यानं आता भूषण ठाकूर एकटेच क्वारंटाइनमध्ये राहत असून स्वत:च जेवण बनवून खात आहेत. 

हे वाचा - Corona Virus : अहमदाबादमध्ये तीन दिवसांचा कर्फ्यू; शाळा सुरु करण्याचाही निर्णय देखील रद्द

गावातील लोका काही दिवसांपूर्वी एका धार्मिक कार्यक्रमामध्ये एकत्र जमले होते. त्यामुळेच सर्वांना कोरोनाची लागण झाली असल्याचं म्हटलं जात आहे. लाहौल स्पितीचे आरोग्य अधिकारी डॉक्टर पल्झोर यांनी स्थानिकांना कोरोनाची चाचणी करून घेण्याचं आवाहन केलं आहे. जिल्ह्यात एकूण 856 कोरोनाचे रुग्ण असून स्पितीमध्ये याचा संसर्ग होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. 

loading image
go to top