esakal | कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी हिंदू महासभेकडून गोमूत्र पार्टी
sakal

बोलून बातमी शोधा

Hindu Mahasabha

चहा पार्टीच्या धर्तीवर गोमुत्र पार्टी आयोजन करण्यात आले आहे. कोरोना व्हायरसविरुद्ध लढण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे. गोमुत्र आणि शेण हे गायीपासून मिळणारे पदार्थ वापरून कोरानाशी लढू शकतो, याबाबत जागरुकता निर्माण करायची आहे.

कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी हिंदू महासभेकडून गोमूत्र पार्टी

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : दिल्लीत कोरोना व्हायरसचे रुग्ण सापडल्यानंतर हिंदू महासभेने या व्हायरसपासून लढण्यासाठी नामी शक्कल लढविली असून, गोमुत्र पार्टीचे आयोजन केले आहे. तसेच या पार्टीत शेणाचा केकही विकण्यात येणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी करा ई-सकाळचे ऍप 

भारतात इटलीहून आलेल्या 15 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे तपासणीत स्पष्ट झाल्यानंतर, भारतात अन्य शहरांमध्येही या व्हायरसचे रुग्ण सापडले आहेत. यांच्यावर उपचार सुरु आहेत. कोरोनामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी न होण्याचा निर्णय घेत, यंदा होळीच्या कार्यक्रमात सहभागी होणार नसल्याचे म्हटले आहे. नुकतेच आसाममधील एका भाजप आमदाराने गोमुत्र आणि शेणामुळे कोरोना ठीक होऊ शकतो, असा दावा केला होता. आता हिंदू महासभेने थेट गोमुत्र पार्टीचेच आयोजन केले आहे.

हिंदू महासभेचे प्रमुख चक्रपाणी महाराज म्हणाले, की चहा पार्टीच्या धर्तीवर गोमुत्र पार्टी आयोजन करण्यात आले आहे. कोरोना व्हायरसविरुद्ध लढण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे. गोमुत्र आणि शेण हे गायीपासून मिळणारे पदार्थ वापरून कोरानाशी लढू शकतो, याबाबत जागरुकता निर्माण करायची आहे. या पार्टीमध्ये आम्ही नागरिकांना गोमुत्र विकत घेण्यासाठी स्टॉल उभारणार आहोत. याबरोबरच गायीच्या शेणाचा केक, अगरबत्ती याही विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. यामुळे हा व्हायरस नष्ट होण्यास मदत होईल. दिल्लीतील हिंदू महासभेच्या कार्यालयात हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. त्यानंतर देशभर अशा मेजवाण्या केल्या जातील. देशभरातील गोशाळांच्या आम्ही संपर्कात आहोत. कोरोनाचा समूळ नाश करण्यासाठी आम्ही मिळून काम करणार आहोत.