esakal | अमित शहांनी मान्य केली दिल्ली विधानसभा निवडणुकीतील चूक
sakal

बोलून बातमी शोधा

home minister amit shah after delhi election result desh ke gaddaron statement

केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी यांनी आज टाईम्स नाऊ समिटी या कार्यक्रमात भाग घेतला. त्यात त्यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीतील पराभवाची मिमांसा केली.

अमित शहांनी मान्य केली दिल्ली विधानसभा निवडणुकीतील चूक

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत प्रचंड अपेक्षा असतानाही, भाजपलाच्या हाती निराशा आली. जवळपास 50 ते 55 जगांवर विजय मिळवण्याची अपेक्षा असलेल्या भाजपला फक्त 8 जागांवर समाधान मानावं लागलं. हा पराभव का झाला? यावर भाजपचा विचार सुरू असतानाच, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं एक वक्तव्य समोर आलंय. टाईम्स नाऊ समिटी या कार्यक्रमात अमित शहा यांनी दिल्लीतील पराभवा संदर्भात आपलं मत व्यक्त केलंय.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

काय म्हणाले अमित शहा?
केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी यांनी आज टाईम्स नाऊ समिटी या कार्यक्रमात भाग घेतला. त्यात त्यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीतील पराभवाची मिमांसा केली. 'देश के गद्दारों...' अशा प्रकारच्या अनावश्यक वक्तव्यांमुळं दिल्लीत पराभव पत्करावा लागला, असं मत अमित शहा यांनी व्यक्त केलं. हे वक्तव्य केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी केलं होतं. पण, अमित शहा यांनी ठाकूर यांच्या नावाचा उल्लेख न करता आपलं मत व्यक्त केलंय. अमित शहा यांनी या वेळी इलेक्ट्रॉनिक मीडियावर आपला राग व्यक्त केला. निवडणुकीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर 'डंडा मारेंगे', अशी टीका केली होती. पण, इलेक्ट्रॉनिक मीडियाने त्यांचे वक्तव्य फार प्रसिद्ध केले नाही. पण, भाजप नेत्यांची वक्तव्यं मोठी करून दाखवण्यात आली, असं सांगत अमित शहांनी नाराजी व्यक्त केली. 

आणखी वाचा - सट्टेबाज ते फिक्सर कोण आहे संजीव चावला?

आणखी वाचा - तीस हजारांच्या उधारीवरून झाला अपमान, संपूर्ण कुटुंबच संपवलं

दिल्लीत आधीच झाला होता पराभव!
अमित शहा यांनी दिल्लीची निवडणूक हा पराभव नसल्याचं सांगण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, 'एखाद्या राज्यात पराभव झाला म्हणजे, सगळंकडं आम्हाला नाकारलं जातंय असं नाही. महाराष्ट्रात आम्ही निवडणुका जिंकल्या. पण आम्ही सत्तेत आलो नाही. हरियाणामध्ये आमच्या केवळ सहा जागा कमी झाल्या. झारखंडमध्ये आमचा खऱ्या अर्थानं पराभव झाला. दिल्लीचा विचार केला तर, आम्ही दिल्लीत सत्तेत नव्हतोच. आम्ही दिल्लीत आधीच पराभूत झालो होतो. त्यानंतरही आमच्या मतांची टक्केवारी वाढली आहे आणि जागाही वाढल्या आहेत.