दिल्लीतील तुकडे-तुकडे गँगला धडा शिकविण्याची वेळ आली : अमित शहा

वृत्तसंस्था
गुरुवार, 26 डिसेंबर 2019

काँग्रेसच्या नेतृत्वात दिल्लीतील जी तुकडे-तुकडे गँग अशांतता पसरवत आहे, आंदोलनाला जबाबदार असलेल्यांना शिक्षा देण्याची वेळ आली आहे. दिल्लीतील जनतेने आता त्यांना दंड केला पाहिजे. केजरीवाल यांना मुख्यमंत्री होऊन पाच वर्षे होत आली.

नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला (सीएए) विरोध करणाऱ्या विरोधकांवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जोरदार टीका करत दिल्लीतील तुकडे-तुकडे गँगला धडा शिकविण्याची वेळ आल्याचे म्हटले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दिल्लीतील कडकडडूमा येथील दिल्ली हबच्या उद्घाटन समारंभात बोलताना अमित शहा यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. तसेच त्यांनी काँग्रेसलाही लक्ष्य केले आहे.

राजभवनाचे स्पष्टीकरण, मंत्रिमंडळ विस्तारावेळी वेळेची कोणतीही मर्यादा नाही

अमित शहा म्हणाले, की काँग्रेसच्या नेतृत्वात दिल्लीतील जी तुकडे-तुकडे गँग अशांतता पसरवत आहे, आंदोलनाला जबाबदार असलेल्यांना शिक्षा देण्याची वेळ आली आहे. दिल्लीतील जनतेने आता त्यांना दंड केला पाहिजे. केजरीवाल यांना मुख्यमंत्री होऊन पाच वर्षे होत आली. पण, त्यांनी दिलेली एकही आश्वासन पूर्ण झालेले नाही. फक्त जाहिराती करून ते नागरिकांची फसवणूक करत आहेत. त्यांनी आयुष्यात फक्त विरोध करायचा आणि आंदोलन करण्याशिवाय बाकी काही केलेले नाही. पंतप्रधान आवास योजना लागू न करून त्यांनी गरिबांचे नुकसान केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Home Minister Amit Shah targets Arvind Kejriwal over agitation in Delhi