
Global Crude Oil: इराण इस्रायल यांच्यात गेल्या ११ दिवसांपासून संघर्ष सुरू आहे. अमेरिकेनं यात उडी घेतल्यानं हा संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणनं होर्मुजची सामुद्रधुनी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तेल व्यापाराच्या दृष्टीने हा महत्त्वाचा जलमार्ग आहे. जगातील २० टक्क्यांपेक्षा जास्त तेलाची या मार्गाने वाहतूक होते. होर्मुजची सामुद्रधुनी बंद झाल्यास जगात महागाई वाढण्याची शक्यता आहे. भारतावर याच्या परिणामाबाबत देशाचे पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी माहिती देताना सांगितलं की, यामुळे भारतातील स्थितीवर फारसा परिणाम होणार नाही.