Assembly Elections : कोरोना पॉझिटिव्ह मतदार कसं करेल मतदान? जाणून घ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

evm

Assembly Elections : कोरोना पॉझिटिव्ह मतदार कसं करेल मतदान? जाणून घ्या

नवी दिल्ली : देश तिसऱ्या लाटेच्या तोंडावर उभा असतानाच निवडणूक आयोगानं पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची (Assembly Elections) घोषणा केली आहे. पण प्रत्यक्ष मतदानादरम्यान जे नागरिक कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) असतील त्यांच्यासमोर मतदान कसं करायचं? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पण निवडणूक आयोगानं याचीही व्यवस्था केली आहे. (How can corona positive voters participate in upcoming Assembly polls)

हेही वाचा: "...तर लॉकडाऊन लादणार नाही"; केजरीवालांचं दिल्लीकरांना आवाहन

पॉझिटिव्ह मतदारांसाठी कशी असेल सुविधा?

  1. ऐंशी वर्षावरील ज्येष्ठ नागरिक जे अपंग असतील किंवा कोरोनाबाधित असतील तर त्यांना पोस्टल बॅलटद्वारे मतदान करता येणार आहे.

  2. ऐंशी वर्षांखालील जे नागरिक कोरोना पॉझिटिव्ह असतील किंवा त्यांना कोरोनासदृश्य लक्षणं असतील त्यांच्यासाठी मतदानाच्यादिवशी ठराविक स्लॉट उपलब्ध असेल. त्याच वेळेत त्यांना मतदान केंद्रावर जाऊन मतदान करता येईल.

  3. मतदानाच्या दिवशी ज्या नागरिकांना तीव्र स्वरुपातील ताप असेल त्यांना टोकन दिलं जाईल तसेच मतदानाच्या शेवटच्या तासात मतदान केंद्रावर येऊन मतदान करण्यास सांगितलं जाईल. यासाठी निवडणूक आयोगानं एक तासानं मतदानाची वेळही वाढवली आहे.

मतदान केंद्रांवर अशी घेतली जाणार काळजी?

  1. यामध्ये मतदान केंद्राचं संपूर्ण निर्जंतुकीकरण करण्यात येईल. निवडणूक आयोगानं ही माहिती दिली आहे.

  2. तसेच मतदान प्रक्रियेत काम करणाऱ्या सर्व निवडणूक अधिकाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा तिसरा डोस अर्थात 'बूस्टर डोस' घेतलेला असणं आवश्यक आहे. अशा कर्चमाऱ्यांची फ्रन्टलाईन वर्कर्स म्हणून गणना होईल.

  3. पोलिंग एजंट, काउंटिंग एजंट यांना पूर्ण लसीकरणाशिवाय मतदान केंद्रात अथवा कक्षात प्रवेश नसेल. तसेच ज्यांचं लसीकरण पूर्ण झालेलं नसेल त्यांना ४८ तासांपूर्वी केलेली RT-PCR चाचणी बंधनकारक असेल.

  4. मतदान केंद्रांच्या सर्व प्रवेशद्वारांवर सर्वांसाठी थर्मल स्कॅनिंग आणि सॅनिटायझरची व्यवस्था असेल.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top