
Amritpal Singh : ट्रक ड्रायव्हर अमृतपाल ISI च्या संपर्कात कसा आला? दिले होते 'हे' टार्गेट!
पंजाब पोलीस खलिस्तानी समर्थक आणि 'वारीस पंजाब दे'चे प्रमुख अमृतपाल सिंह याच्या मागावर आहेत. पोलीस राज्यभर सर्च ऑपरेशन राबवत आहेत. पोलिसांनी अमृतपाल सिंह याला फरार घोषित केले आहे.
अमृतपाल सिंहचा फायनान्सर दलजीत सिंह कलसी तसेच अनेक बॉडीगार्डसह पोलिसांनी ७८ जणांना अटक केली आहे. यासोबतच इतर अनेकांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
दरम्यान, एक मोठी माहिती समोर आली आहे. गुप्तचर विभागाच्या सुत्रांच्या हवाल्याने आज तकने माहिती दिली आहे. अमृतपाल सिंह पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेच्या मदतीने पंजाबमध्ये दहशतवाद पसरवत होता.
अमृतपाल दुबईत ट्रक ड्रायव्हर होता, तेव्हा तो पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या संपर्कात आला होता. येथे त्याला शीख तरुणांना धर्माच्या नावाखाली प्रवृत्त करण्याचे काम देण्यात आले. त्यासाठी आयएसआयच्या निधीतून शीखांना खलिस्तानच्या नावाने एकत्र करून पंजाबमध्ये सक्रिय करण्याचे काम होते.
पंजाबमध्ये आल्यानंतर अमृतपालने आयएसआयच्या सांगण्यावर पंजाबमध्ये एक संघटन तयार केले. यासाठी त्याने अमृत संचारचा सहारा घेतला. त्यानंतर त्याने खालसा वहिर नावाने अभियान चालवले. गावांमध्ये संघटन मजबूत केले. यावेळी त्याने पंजाबच्या मुद्द्यांवर लोकांना भडकावले. तसेच नागरिकांना केंद्र सरकारच्या विरोधात उभे केले.
धर्माच्या नावाखाली अमृतपाल लोकांना त्यांचे मनासारखे काम करून देण्यात यशस्वी झाला. यामुळे आयएसआयला मोठा फायदा झाला. त्यांचे मनोबल देखील वाढले.
या सर्व प्रकरणामुळे पंजाबमधील लोकांमध्ये दहशतवादाच्या वाईट काळाच्या आठवणी जाग्या झाल्या आहेत. मात्र पोलीस अमृतपालच्या हात धूऊन मागे लागले आहेत.
पंजाबमध्ये दहशतवादाचे पुनरुज्जीवन करण्याचा आणि सांप्रदायिक असंतोष पसरवण्याचा प्रयत्न केल्यावर गुप्तचर विभागाने सूचनाही दिली होती. धार्मिक नेते आणि गर्दीची ठिकाणे आयएसआय आणि खलिस्तानी दहशतवादी गटांच्या निशाण्यावर असल्याचा इशारा केंद्रीय सुरक्षा यंत्रणांकडून जारी करण्यात आला होता. तेव्हापासून पोलीस अमृतपालवर लक्ष ठेऊन आहेत.