Mahatma Gandhi Jayanti : महात्मा गांधींचे ९ विचार जे तुम्हालाही देतील जगण्याचा नवा मार्ग

महात्मा गांधींचे हे तीन विचार जपलेत तर आयुष्यात मिळेल यश
Mahatma Gandhi Birth Anniversary
Mahatma Gandhi Birth Anniversaryesakal

Mahatma Gandhi Jayanti : सत्य आणि अहिंसा हा एकच मंत्र जपणारे देशपिता महात्मा गांधी यांची आज जयंती. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महात्मा गांधींचा मोलाचा वाटा आहे. महात्मा गांधीचे विचार आजही अनेकांच्या जीवनात आदर्श ठरतात. या महान व्यक्तीच्या काही महत्वाच्या विचारांचा प्रभाव तुमच्याही आयुष्यात असेल तर तुम्हालाही यश मिळेल आणि तुमचं आयुष्य सुधारेल.

आयुष्यात पुढे जाण्यासाठी एक चांगला व्यक्ती असणं आणि त्याबरोबर आपल्या ज्ञानात चांगल्या गोष्टी आपण आत्मसात करणे महत्वाचे ठरते. त्यासाठी महात्मा गांधींचे हे नऊ विचार तुम्ही आत्मसात करायला हवेत.

१) चारित्र्याचा विकास हेच सर्वात मोठे शिक्षण

२) ईश्वर म्हणजे सत्य, प्रेम, नीती

३) शरीर असेल तोपर्यंत त्याचा उपयोग केवळ सेवेसाठी करावा

Mahatma Gandhi Birth Anniversary
Mahatma Gandhi : इतिहास 8 ऑगस्टचा; महात्मा गांधीजींच्या चळवळीने ब्रिटीश राजसत्ता हादरली होती

४) हा महार, तो ब्राम्हण असा उच्च नीच भाव निर्माण होत असेल तर त्या धर्माला मी धर्म मानणार नाही.

५) जोपर्यंत संबंध मानवजातीत ऎक्याच्या भावनेस महत्व दिले जात नाही, तोपर्यंत प्रार्थना, उपवास, जपतप निरर्थक आहेत.

६) सुधारणा म्हणजे ज्याच्यामुळे मनुष्य आपले कर्तव्य बजावित राहतो ते आचरण.

Mahatma Gandhi Birth Anniversary
Mahatma Gandhi: येरवडा तुरुंगात महात्मा गांधींनी बनवला होता फोल्डिंग चरखा, या महालात 2 वर्ष होते नजरकैद

७) माणसात जे सत्य, सद्गुण असतात, त्यांना प्रकाशात आणणे हे शिक्षणाचे कार्य आहे.

८) जिज्ञासा असल्याशिवाय ज्ञान मिळणे शक्य नाही. जिज्ञासा ही ज्ञानाची पहिली पायरी होय.

९) धर्म म्हणजे ईश्वराकडे जाण्याच्या वाटा. माणसातील माणुसकी, मानवता, प्रगट करणारा तो खरा धर्म.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com