Arvind Kejriwal : शुगर असूनही केजरीवालांनी तिहारमध्ये कितीवेळा खाल्ले आंबे अन् पुरी? वकिलांनी कोर्टात सांगितलं...

अरविंद केजरीवाल यांची नियमित तपासणी आणि इन्सुलीन मंजूर करण्याच्या मागणीवर कोर्टाने केजरीवालांचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांना सर्वांना याचिकेची कॉपी देण्यास सांगितलं. कोर्टाने म्हटलं, आम्हाला याबाबत माहिती नाहीये की अर्जात काय मागणी केलीय. त्यावर सिंघवींनी म्हटलं की, आम्ही ईडीला याचिकेची एक कॉपी दिली होती.
Arvind Kejriwal
Arvind KejriwalEsakal

Arvind Kejriwal Arrest Updates : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तिहार जेलमध्ये नियमितपणे तपासणी आणि इन्सुलीन देण्यासंबंधीच्या याचिकेवर सुनावणी झाली. यावेळी केजरीवालांनी कोर्टासमोर पुन्हा जेवणाचा मुद्दा उपस्थित केला.

अरविंद केजरीवाल यांच्या वतीने वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी म्हटलं की, अरविंद केजरीवाल यांच्यासाठी जेलमध्ये ४८ वेळा घरचं जेवणं गेलं. ज्यामध्ये केवळ तीनवेळा आंबा देण्यात आलेला होता. ८ एप्रिलनंतर केजरीवाल यांच्या जेवणात आंबा देण्यात आलेला नव्हता. तर ४८ पैकी केवळ एकदा नवरात्रीच्या जेवणात पुरी देण्यात आलेली होती. त्यावर ईडीने कोर्टाला सांगितलं की, जेल अथॉरिटीकडून केजरीवाल यांच्या डाएट चार्टचा रिपोर्ट येत आहे.

दुसरीकडे अरविंद केजरीवाल यांची नियमित तपासणी आणि इन्सुलीन मंजूर करण्याच्या मागणीवर कोर्टाने केजरीवालांचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांना सर्वांना याचिकेची कॉपी देण्यास सांगितलं. कोर्टाने म्हटलं, आम्हाला याबाबत माहिती नाहीये की अर्जात काय मागणी केलीय. त्यावर सिंघवींनी म्हटलं की, आम्ही ईडीला याचिकेची एक कॉपी दिली होती.

Arvind Kejriwal
Phoenix Mall Fire: पुण्यातील विमान नगर भागातील फिनिक्स मॉलला भीषण आग, 6 बंब घटनास्थळी दाखल

ईडीने कोर्टात कोणता दावा केला होता?

कोर्टासमोर ईडीने म्हटलं की, केजरीवाल यांना टाईप २ चा मधुमेहाचा आजार आहे. ते जेलमध्ये बटाटा-पुरी, आंबे आणि गोड खात आहेत. असं ते जाणीवपूर्वक करत आहेत. हा एक प्रकारे मेडिकलच्या आधारावर जामीन घेण्याचा प्रकार आहे.

अरविंद केजरीवाल यांच्या प्रकृतीवरुन ईडीने म्हटलं की, कोर्टाने केजरीवाल यांना घरचं जेवण खाण्याची मुभा दिली आहे. जेल डीजींनी आम्हाला केजरीवाल यांच्या आहाराविषयी माहिती दिली आहे. त्यांना बीपीचा आजार आहे. तरीही ते बटाटा-पुरी, केळी, आंबे आणि गरजेपेक्षा गोड पदार्थ खात आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com