
काश्मीर खोऱ्यात सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. श्रीनगरमधील महादेव पर्वतावर लष्कर, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. या दहशतवाद्यांपैकी एक हाशिम मुसा उर्फ सुलेमान आहे. मुसा पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार होता. हा हल्ला २२ एप्रिल रोजी पहलगामच्या बैसरन खोऱ्यात झाला होता. मुसा पाकिस्तानी लष्कराच्या विशेष दलाचा सैनिक होता.