
Indian Flag : प्रजासत्ताक दिनानंतर प्लास्टिकच्या तिरंगा झेंड्याचं काय कराल?
प्रजासत्ताक दिनी आपण आवडीने प्लास्टिकचे तिरंगा झेंडे विकत घेतो. कधी हातात तर कधी गाडीवर प्लास्टिकचे तिरंगा झेंडे वापरतो. अर्थात प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी देशाविषयी प्रेम व्यक्त करणारी एक भावना असते पण तुम्ही अनेकदा पाहले असेल की प्रजासत्ताक दिवसानंतर हेच प्लास्टिकचे तिरंगा झेंडे कचऱ्याच्या ढिगारात जातात आणि नकळत तिरंग्याचा अपमान होतो.
कापडी झेंडे व्यवस्थित नियमाप्रमाणे फोल्ड केल्या जाऊ शकते पण प्लास्टिकच्या तिरंगा झेंड्याचं काय करायचं हा प्रश्न पडतो. या संदर्भात माहिती देणारी एक पोस्ट सध्या लिंकडीनवर व्हायरल होत आहे.

व्हायरल पोस्टमध्ये सांगितल्याप्रमाणे आपण नेहमी प्लास्टिक तिरंगा झेंड्याच्या जागी कापडी तिरंगा झेंड्याचा वापर करणे गरजेचे आहे कारण कापडी झेंडा पुन्हा वापरता येतो पण प्लास्टिक झेंड्याचा नंतर काय करावं हा प्रश्न निर्माण होतो.
कापडी तिरंगा झेंडा प्रजासत्ताक दिनानंतर एका विशिष्ट पद्धतीने फोल्ड करुन व्यवस्थित ठेवावा.
तुमच्या शहरात जर तुम्हाला डॅमेज झालेले तिरंगा झेंडे किंवा रस्त्यावर खाली पडलेले तिरंगा झेंडे दिसलेत तर तुम्ही महानगरपालिकेला किंवा शहरातील स्वच्छता विभागाला या संदर्भात माहिती द्यावी.
The Flag Code of India, 2002 नुसार राष्ट्रध्वजाच्या प्रतिष्ठेशी सुसंगत राहून योग्य आदरयुक्त पद्धतीने एकांतात तिरंगाची विल्हेवाट लावू शकता.
याशिवाय तुम्ही काही लोकल पर्यावरणवादी क्लब्स आणि एनजीओजवळ असे तिरंगे गोळा करू शकता जे या तिरंग्यांना रिसायकल करण्यास मदत करते.
प्लास्टरुट्चे फाउंडर कपिल जंगले यांनी ही पोस्ट लिंकडीनवर शेअर केली आहे.
प्रजासत्ताक दिनी प्रेम व्यक्त करण्यासाठी आपण अनेकदा प्लास्टिक तिरंगा झेंडा वापरतो. पण या तिरंगाचा अपमान न होण्याची काळजीही आपण घेतली पाहिजे. तिरंग्याचा अपमान होऊ नये, याची काळजी घेणे प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.