गायक सिद्धू मुसेवालाच्या पार्थिवावर आज अत्यंसंस्कार; चाहत्यांची तुफान गर्दी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Suddhu Moose Wala_funaral

गायक सिद्धू मुसेवालाच्या पार्थिवावर आज अत्यंसंस्कार; चाहत्यांची तुफान गर्दी

चंदीगड : प्रसिद्ध पंजाबी गायक आणि काँग्रेस नेता सिद्धू मुसेवाला याच्या पार्थिवावर आज (मंगळवार) त्याचं गाव मूसा इथं अंत्यसंस्कार होणार आहेत. अत्यंसंस्कारापूर्वी सिद्धूची अत्यंयात्रा काढण्यात आली असून त्याच्या आवडत्या ट्रॅक्टरवरुनच ही अंत्ययात्रा काढण्यात आली आहे. विशेष म्हणजे या अत्यंयात्रेला तुफान गर्दी झाली असून सिद्धूचे चाहते आणि ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली आहे.

आपल्या आवडत्या गायकाला निरोप देण्यासाठी हजारो लोक रस्त्यांवर दिसत आहेत. यावेळी प्रत्येकाचे डोळे पाणावलेले दिसत आहेत. मूसा गावाच्या प्रत्येक घरात, जवळचे रस्ते आणि झांडांवरही लोक बसल्याचं दिसत आहेत. अत्यंविधीवेळी सिद्धूचं शेवटचं गाणं 'द लास्ट राइड' वाजवण्यात येणार आहे. अंत्यसंस्कारापूर्वी सिद्धूच्या वडिलांनी त्याच्या डोक्यावर शेवटची पगडी बांधली.

हेही वाचा: Nagpur Election : नागपूर महापालिकेची आरक्षण सोडत जाहीर; पाहा वॉर्ड रचना

दरम्यान, सिद्धूच्या हत्येनंतर विविध स्तरातून तीव्र प्रतिक्रिया आल्या होत्या. भारतातील मनोरंजन क्षेत्रासह परदेशातूनही मुसेवालाच्या मृत्यूची बातमी धक्कादायक असल्याचं सांगतना अनेकांनी शोक व्यक्त केला. कॅनडातील कॉमेडियन लिली सिंह ने देखील आपल्या इन्स्टावर सिद्धूला श्रद्धांजली वाहिली आणि पंजाबी संगीत क्षेत्रातील तरुण कलाकाराची हत्या झाल्याबद्दल शोक व्यक्त केला.

हेही वाचा: अहिल्याबाई होळकरांचं कार्य रोहित पवार पुढे नेत आहेत - शरद पवार

रविवारी सिद्धू मुसेवाला याच्या कारवर काही अज्ञातांनी गोळ्यांचा वर्षाव केला, यामध्ये सिद्धूला सहा गोळ्या लागल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला. मारेकऱ्यांनी सुमारे तीन गोळ्या झाडल्याचं फॉरेन्सिक टीमच्या तपासानंतर समोर आलं होतं. आदल्याच दिवशी मुसेवाला याच्या सुरक्षेत राज्य सरकारनं कपात केली होती त्यानंतर लगेचच त्याची हत्या झाली.

Web Title: Huge Crowd Joins The Funeral Procession Of Singer Sidhu Moose Wala In Punjab Mansa

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :PunjabDesh news
go to top