Yogi Adityanath: आमदार हुमायूं कबीर यांनी मागितली हिंदूंची माफी! योगी आदित्यनाथ यांना दिलेल्या 'त्या' धमकीचा पश्चात्ताप?

Humayun Kabir apology over Yogi Adityanath threat: ‘भाजप नेत्यांना भागीरथीत फेकू’ विधानावर युटर्न; हुमायूं कबीर यांच्या माफीनाम्याने बंगालमध्ये खळबळ
humayu kabir apology yogi adityanath

humayu kabir apology yogi adityanath

esakal

Updated on: 

पश्चिम बंगालच्या राजकारणात सध्या माजी टीएमसी (TMC) आमदार हुमायूं कबीर यांच्या माफीनाम्याची जोरदार चर्चा सुरू आहे. आपल्या वादग्रस्त विधानांसाठी ओळखल्या जाणाऱ्या कबीर यांनी चक्क हिंदू समुदायाची माफी मागितली आहे. या प्रकरणाचा थेट संबंध उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी जोडला जात आहे.

मुर्शिदाबाद येथील एका सभेत बोलताना हुमायूं कबीर यांनी आपल्या जुन्या विधानांबद्दल खेद व्यक्त केला. विशेषतः १ मे २०२४ रोजी दिलेल्या भाषणाचा त्यांनी उल्लेख केला. त्या भाषणात त्यांनी भाजप नेत्यांना आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना आव्हान दिले होते. "योगी आदित्यनाथ, हा उत्तर प्रदेश नाही, मुर्शिदाबाद आहे. तुम्ही जर आम्हाला धमकावत राहिलात, तर भाजप नेत्यांना भागीरथी नदीत फेकून देऊ," असे वादग्रस्त विधान त्यांनी केले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com