

उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यात पतीने आपल्या पत्नीची वेणी कापल्याची एक अनोखी घटना समोर आली आहे. बहिणीच्या लग्नाला जाण्यासाठी पत्नीने मेकअप केला. यामुळे संतापलेल्या पतीने तिची वेणी कापली. गुन्हा केल्यानंतर आरोपी पती फरार आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.