Hindu Marriage Act:पत्नीला फिट येते म्हणून पतीने मागितला घटस्फोट, कोर्टानं हिंदू विवाह कायद्याअंतर्गत फेटाळली याचिका

Epileptic Seizures:पत्नीला फिट येते म्हणून एका पतीने न्यायालयात घटस्फोटासाठी याचिका दाखल केली होती. मात्र, कोर्टानं नवऱ्याची याचिका फेटाळून लावली आहे.
divorce
divorce

Husband Demanded Divorce:पत्नीला फिट येते म्हणून एका पतीने न्यायालयात घटस्फोटासाठी याचिका दाखल केली होती. मात्र, कोर्टानं नवऱ्याची याचिका फेटाळून लावली आहे. जर साथीदार अपस्माराच्या त्रासातून जात असेल, तर हिंदू विवाह कायद्याअंतर्गत घटस्फोटाचे कारण मानता येणार नाही,

असा निर्णय या प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाने दिला. त्याचबरोबर कोर्टानं म्हटलय की असे अने वैद्यकीय पुरावे आहेत, जे सिद्ध करतात की अशी परिस्थिती पति-पत्नीच्या वैवाहिक आयुष्यात अडचण निर्माण करत नाही.

या प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या विभागीय खंडपीठाने २०१६साली कौटुंबिक न्यायालयाने दिलेला निर्णय अबाधित ठेवला. न्यायमूर्ती विनय जोशी आणि न्यायमूर्ती वाल्मिकी एसए मेंगेस यांनी पतीने केलेले सर्व आरोप फेटाळून लावले.

पत्नीला अपस्माराचा त्रास असल्याचे पतीने सांगितले. तसेच हा असाध्य आजार असल्याचे सांगून पत्नीचे मानसिक संतुलन फिट येत असल्याने ढासळल्याचे त्याने सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com