
बायकोनं इतकं छळलं की नवऱ्याचं वजन 21 किलोनं घटलं!
हरियाणामधील हिसारमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीचे वजन लग्नानंतर बायकोच्या अत्याचारांमुळे 21 किलोने कमी झाले. दरम्यान, यावरुन न्यायलयाने घटस्फोटास मान्यता दिली आहे. पंजाब आणि हरियाना उच्च न्यायालयाने हिसार कौटुंबिक न्यायालयाने घटस्फोटाला मान्यता देण्याच्या निर्णय कायम ठेवला.
एका दिव्यांग व्यक्तीने आरोप केला आहे की, ''त्याच्या पत्नीच्या मानसिक छळामुळे त्याचे वजन 74 किलोवरुन 53 किलो झाले'' म्हणून त्याला घटस्फोट हवा आहे. संबिधत व्यक्तीला कमी ऐकू येते. संबधित व्यक्तीच्या पत्नीने हिसार कौटुंबिक न्यायलयाच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता जो न्यायालयने फेटाळला. महिलेद्वारा आपल्या पती आणि त्याच्या कुटुंबाविरोधात जी तक्रार दाखल केली होती ते सर्व खोटे होते आणि ते मानसिक छळ केल्या समान आहे. न्यायाधीश रितू बाहरी आणि न्यायाधीश अर्चना पुरी यांच्या खंडपीठाने 27 ऑगस्ट 2019 रोजी जाहीर केलेले आदेश रद्द करण्याच्या मागणीबाबत महिलेद्वारा दाखल केलेली अर्ज न्यायलयाने फेटाळाला. महिलेच्या पतीने कौटुंबिक न्यायलयात दाखल केलेली याचिका मान्य करण्याचा आदेश न्यायलयाने दिला.
पीडित पतीने पत्नीबाबत सांगितले की, ती तापट स्वभावाची आणि वायफळ खर्च करत असे. तिने कधीच कुटुंबासोबत सांमजस्याने वागण्याचा प्रयत्न केला नाही. छोट्या छोट्या गोष्टींवर ती वाद घालत असे पण त्यामुळे त्याचे आई-वडिल आणि नातेवाईकांसमोर मला अपमानस्पद वागणूक मिळत असे. भविष्यात पत्नीची वागणूक बदलले या आशेवर मी नेहमी शांतच राहत होता पण तिची वागणूक मात्र बदलली नाही.'' यावेळी आपल्या पत्नीवर मानसिक छळ केल्याचा आरोप लावत न्यायलयासमोर त्याने सांगितले की, लग्नाच्यावेळी माझे वजन 74 किलो होते पण, त्यानंतर 53 किलो वजन झाले.''

पतीच्या आरोपांना नाकारत स्वत:ची बाजू मांडताना पत्नीने सांगितले की, ''तिने आपली वैवाहिक कर्तव्य प्रेम आणि सन्मानाने पार पाडली.'' लग्नाच्या 6 महिन्यानंतर पती आणि त्याच्या कुटुंबाच्या सदस्यांनी हुंड्यासाठी तिचा छळ केल्याचा आरोपही तिने लावला. सुनावनी दरम्यान, महिलेने 2016 मध्ये आपल्या नवऱ्याला सोडले होते आणि आपल्या मुलीलाही सासरी ठेवले होते आणि कधीच तिला भेटण्याचा प्रयत्नही केला नाही अशी माहिती न्यायलयासमोर आली. पतीच्या कुटुंबाने हुंड्याची मागणी न केल्याची आणि तिच्या उच्च शिक्षणासाठी खर्च केल्याची माहिती देखील न्यायलयासमोर आली. महिलेने तिच्या पती आणि त्याच्या कुटुंबाविरोधात खोटी तक्रार दाखल केल्याचेही न्यायलयात उघडकीस आले.
अशा प्रकारच्या घटस्फोटाच्या मागणीला उच्च न्यायलयाने याचिका रद्द केली आणि हिसार न्यायलयाचा निर्णय कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. ज्यानुसार पतीला घटस्फोट घेण्याची मंजूरी दिली गेली.
या दाम्पत्याची एप्रिल 2012मध्ये लग्न झाले होते आणि त्यांना एक मुलगी देखील आहे. पिडित पती एका बँकेत काम करत असून पत्नी हिसारमधील एका खासगी शाळेत शिक्षिका आहे. या दाम्पत्याची मुलगी वडिलांसोबत राहत आहे