HyderabadEncounter : 'त्या' चौघांचे मृतदेह सुरक्षित ठेवण्याचे आदेश

वृत्तसंस्था
शनिवार, 7 डिसेंबर 2019

न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार या आरोपींचे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपवण्यात येणार नाहीत. या घटनेविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून त्यामध्ये न्यायिक हस्तक्षेपाची मागणी करण्यात आली आहे. त्यानंतर न्यायालयाने या आरोपींचे मृतदेह सुरक्षित ठेवण्याचे आदेश सरकारला दिले आहेत. 

हैदराबाद : पशुवैद्यक डॉक्टर तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिला जिवंत जाळणाऱ्या नराधमांचा हैदराबाद पोलिसांनी स्पॉटवर फैसला केला. मात्र, आता हे प्रकरण न्यायालयात गेले असून, या घटनेत ठार झालेल्या आरोपींचे मृतदेह 9 डिसेंबर संध्याकाळी 8 वाजेपर्यंत सुरक्षित ठेवण्याचे आदेश तेलंगण उच्च न्यायालयाने दिले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार या आरोपींचे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपवण्यात येणार नाहीत. या घटनेविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून त्यामध्ये न्यायिक हस्तक्षेपाची मागणी करण्यात आली आहे. त्यानंतर न्यायालयाने या आरोपींचे मृतदेह सुरक्षित ठेवण्याचे आदेश सरकारला दिले आहेत. 

बलात्काऱ्यांचा जागेवर ‘फैसला’

शुक्रवारी आरोपींनी मूळ गुन्हा नेमका कसा केला, याची पडताळणी करण्यासाठी पोलिसांचे एक पथक या चारही आरोपींना घेऊन हैदराबादनजीकच्या घटनास्थळी गेले होते. तेव्हा हे आरोपी पोलिसांचीच शस्त्रे घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार केला, यात चारही नराधम घटनास्थळीच ठार झाले.

झारखंडमध्ये दुसऱ्या टप्प्यात मतदान; 20 जागांवर लढा

हैदराबाद पोलिसांच्या या एन्काउंटरवर देशभरात गल्लीपासून ते दिल्लीतील संसदेपर्यंत सर्वत्र पडसाद उमटले. अनेकांनी पोलिसांच्या या कृत्याचे स्वागत केले असून, काहींनी त्याला आक्षेप घेतला. राष्ट्रीय मानवी हक्क संघटनेनेही याची दखल घेत सविस्तर चौकशीचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी या प्रकरणातील सर्व आरोपींना पहाटेच घटनास्थळी आणले होते, ज्या ठिकाणी ही चकमक झाली, तो परिसर हैदराबादला लागूनच आहे. पोलिस अधिकारी गुन्ह्याची तालीम घेत असताना आरोपींनी त्यांची शस्त्रे बळकावित पोलिसांवर गोळीबार करून पळ काढण्याचा प्रयत्न केला. या वेळी पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारामध्ये चारही आरोपी मारले गेले. या चकमकीमध्ये दोन पोलिस कर्मचारीदेखील जखमी झाले आहेत. या चारही आरोपींनी पशुवैद्यक असणाऱ्या तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिला जिवंत जाळल्यानंतर या सर्वांना 29 नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली होती. या घटनेनंतर देशभरात प्रचंड जनक्षोभ निर्माण झाला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hyderabad Encounter Preserve bodies of accused till Dec 9 orders Telangana High Court