हनी ट्रॅपचं वारं, महाराष्ट्रानंतर हैदराबादमध्ये तरुणाची एक कोटी रुपयांची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 2 June 2020

तरुणाला ज्या महिलेनं लग्नाचं आमिष दाखवलं तिला 22 वर्षांचा मुलगा असून त्याच्यासोबत मिळून तिने ही फसवणूक केली आहे.

हैदराबाद, 02 जुन : गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रातील अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यात हनी ट्रॅपची काही प्रकरणे समोर आली होती. आता हे वारे तेलंगणातील हैदराबादमध्येही पोहोचले आहे. हैदराबाद इथं मॅट्रिमनी साइटवर आयुष्याची जोडीदार शोधणाऱ्याला एक कोटींचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. हैदराबादमध्ये लग्नाच्या नावावर एका एनआरआय तरुणाची 65 लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी महिलेला अटक केली होती. याची माहिती मिळताच एक तरुण पोलीस स्टेशनला पोहोचला. त्यानं सांगितलं की, संबंधित महिलेनं त्याचीसुद्धा लग्नाचं आमिष दाखवून एक कोटींची फसवणूक केली आहे. धक्कादायक म्हणजे महिलेला 22 वर्षांचा मुलगा आहे.
पोलिसांनी फसवणूक प्रकरणी मालविका देवती नावाच्या महिलेला अटक केली होती. तरुणाने या महिलेसोबत व्हॉटसअॅप आणि टेलिग्रामवर झालेलं चॅटही पोलिसांना दाखवलं होतं. त्यानं म्हटलं की, मालविकाने त्याला प्रेमाच्या जाळ्यात फसवलं आणि त्याचे पैसे लाटले.

जेसिका लाल हत्याकांडातील दोषीची तिहार जेलमधून सुटका

मालविका आणि तिचा 22 वर्षांचा मुलगा प्रणव ललित गोपालला जुबली हिल्स पोलिसांनी 27 मे रोजी अटक केली होती. दोघांवर एका अमेरिकेतील एनआरआयची फसवणूक केल्याचा आरोप होता. पोलिसांनी सांगितले की, मालविकाविरुद्ध नल्लाकुंता मारेडपल्ली आणि सीसीएस पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तरुण 2018 मध्ये एका तेलुगु मॅट्रिमनी साइटवरून मालविकाच्या संपर्कात आला होता. तिने साइटवर अनु पल्लवी मंगती नावाने फेक प्रोफाइल तयार केलं होतं. यामध्ये आपण भारतीय वंशाची डॉक्टर असल्याचे सांगत अमेरिकेत काम करत आहे असे म्हणाले होते. 

तिसरा विवाह करून आल्याचे पत्नीने पाहिले अन्...

मालविकाने तरुणाला असेही सांगितले होते की ती एका राजकारणी घराण्यातील आहे. फेब्रुवारी 2018 मध्ये तरुणाला तिने आपला फोन हॅक झाल्याचे सांगत अकाउंट ऑपरेट करता येत नसल्याचं म्हटले होते. तेव्हा मालविकाने तरुणाकडे पैसे मागितले होते. तरुणाने मालविकाच्या खात्यावर 1.02 कोटी रुपये पाठवले होते. 

रुग्णवाहिकेविना काेराेनाबाधित तब्बल दीड दिवस घरातच

तरुण एका आयटी कंपनीत नोकरी करत असून त्याचे मासिक वेतन 80 हजार रुपये आहे. त्याने बचत करून हे पैसे साठवले होते. मालविकाने त्याच्याशी खोटे बोलून फसवणूक केली. तिच्याविरुद्ध आयटी अॅक्ट अंतर्गंत गुन्हा दाखल केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hyderabad honey trap women cheated to it professional for 1 Crore rupee