हैदराबाद अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 डिसेंबर 2019

हैदराबादमधील तरुणीवर झालेल्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळणं देण्याचा प्रयत्न केला जात आहे. यात काही माध्यम समुहांचाही हात असल्याचा आरोप होत आहे. एका इंग्रजी न्यूज पोर्टलने आरोपी मोहम्मदच्या आईची मुलाखत प्रसिद्ध केली आहे. त्यात मोहम्मद रात्री घरी परतल्यानंतर आपल्या ट्रकला अपघात झाला असून, माझ्याकडून एका मुलीचा खून झाल्याचं सांगत होता, असं आईनं म्हटलंय.

हैदराबाद - हैदराबादमधील तरुणीवर झालेल्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळणं देण्याचा प्रयत्न केला जात आहे. यात काही माध्यम समुहांचाही हात असल्याचा आरोप होत आहे. एका इंग्रजी न्यूज पोर्टलने आरोपी मोहम्मदच्या आईची मुलाखत प्रसिद्ध केली आहे. त्यात मोहम्मद रात्री घरी परतल्यानंतर आपल्या ट्रकला अपघात झाला असून, माझ्याकडून एका मुलीचा खून झाल्याचं सांगत होता, असं आईनं म्हटलंय. संबंधित तरुणीवर अत्याचार झाला नसून, अपघात लपवण्यासाठी तिचा मृतदेह जाळल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप होत आहे.

हैदराबाद 'निर्भया' प्रकरण; नागरिक रस्त्यावर, 3 पोलिस निलंबित

हद्दीचा विषय सांगणारे तिघे पोलिस निलंबित
पशुवैद्यकीय डॉक्‍टर तरुणीच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल करून घेण्यास उशीर केल्याबद्दल तीन पोलिसांना आज निलंबित करण्यात आले. या तिघांविरोधात संबंधित तरुणीच्या कुटुंबाने तक्रार केली होती. तरुणी बेपत्ता असल्याची तक्रार करण्यासाठी तिचे कुटुंबीय पोलिस ठाण्यात गेले असता, हद्दीचे कारण सांगत या पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिला होता. त्यांनी वेळीच तक्रार घेत हालचाल केली असती तर तरुणीवर अत्याचार झाला नसता, असा दावा कुटुंबाने केला होता. दुसऱ्या दिवशी तरुणीचा मृतदेह सापडला होता. कुटुंबाच्या तक्रारीची दखल घेत वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी चौकशी केली आणि एक पोलिस उपनिरीक्षक आणि दोन कॉन्स्टेबल यांना निलंबीत करण्यात आले. तसेच, कोणी तक्रार नोंदविण्यास आले तर हद्दीचे कारण सांगू नये, असे स्पष्ट निर्देशही सर्व पोलिस ठाण्यांना देण्यात आले आहेत. या प्रकरणात पोलिसांची भूमिका नकारात्मक होती, असा दावा राष्ट्रीय महिला आयोगाच्या प्रमुख रेखा शर्मा यांनी केला आहे. या प्रकरणात अटक केलेल्या चार आरोपींना न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

आरोपींवर वकीलांचा बहिष्कार 
या प्रकरणातील चारही आरोपींची बाजू लढविण्यास जिल्हा बार असोसिएशनने नकार दिला आहे. या चौघांनी केलेल्या घृणास्पद कृत्याला विरोध करत नैतिक आणि सामाजिक जबाबदारी म्हणून आम्ही हा निर्णय घेतल्याचे बार असोसिएशनने म्हटले आहे. या प्रकरणी चौघांना मृत्युदंड होण्याची शक्‍यताही काही वकीलांनी बोलून दाखविली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hyderabad rape case media trying to prove that was accident