esakal | नाराजीबद्दल गुजरातच्या उपमुख्यमंत्र्यांनी सोडलं मौन, म्हणाले....
sakal

बोलून बातमी शोधा

nitin patel

नाराजीबद्दल गुजरातच्या उपमुख्यमंत्र्यांनी सोडलं मौन, म्हणाले....

sakal_logo
By
दीनानाथ परब

अहमदाबाद: विधानसभा निवडणुकीला वर्षभराचा कालावधी बाकी असलेल्या गुजरातमध्ये (gujarat politics) मोठा राजकीय फेरबदल झाला आहे. विजय रुपानी (vijay rupani) यांना हटवून त्यांच्या जागी भुपेंद्र पटेल (Bhupendra Patel) यांची मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली आहे. भुपेंद्र पटेल आज दुपारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. गुजरातमध्ये झालेली ही राजकीय घडामोड अनेकांसाठी अनाकलनीय आहे. कर्नाटकप्रमाणे गुजरातमध्येही भाजपा (bjp) नेतृत्वाने राज्याला मुख्यमंत्री म्हणून नवीन चेहरा दिला आहे.

दरम्यान गुजरातमध्ये झालेल्या या राजकीय फेरबदलामुळे उपमुख्यमंत्री नितीन पटेल नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यावेळी सुद्धा नितीन पटेल यांची मुख्यमंत्रीपदाची संधी हुकली. आनंदीबेन पटेल, विजय रुपाणी आणि आता भुपेंद्र पटेल यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाली, त्या प्रत्येकवेळी नितीन पटेल यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत होते. पण प्रत्येकवेळी त्यांची संधी हुकली.

हेही वाचा: मुंबई: कोलगेट समजून उंदीर मारण्याच्या पेस्टने ब्रश, मुलीचा मृत्यू

या चर्चांच्या पार्श्वभुमीवर नितीन पटेल यांना नाराज नसल्याचा खुलासा करावा लागला आहे. "पक्षाने भुपेंद्र पटेल यांची मुख्यमंत्रीपदी निवड केली म्हणून मी नाराज नाही" असे नितीन पटेल यांनी सांगितले आहे. "मी वयाच्या १८ व्या वर्षापासून भाजपामध्ये काम करत आहे. मला पक्षात पद मिळो अथना न मिळो, मी काम सुरुच ठेवणार आहे" असे नितीन पटेल यांनी सांगितले.

हेही वाचा: उदय चोप्रासोबतच्या नात्यावर अभिनेत्री नर्गिस फाखरीचा खुलासा

"भुपेंद्र पटेल माझे जुने कौटुंबिक मित्र आहेत. मी त्यांना शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री म्हणून त्यांना शपथ घेताना पाहून मला आनंदच होईल. त्यांनी मला मार्गदर्शन करायलाही सांगितले आहे" असे नितीन पटेल म्हणाले. "केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज शपथविधीसाठी गुजरातमध्ये येणार आहेत. मी त्यांचे विमानतळावर स्वागत करणार आहे" असे नितीन पटेल यांनी सांगितले.

कशामुळे रंगली नितीन पटेल यांच्या नाराजीची चर्चा

माझ्या आय़ुष्यात अनेक चढ उतार पाहिले आहेत. मी लोकांच्या मनात राहतो आणि तिथून मला कोणी काढू शकत नाही. रविवारी मेहसाणामधील एका रस्त्याच्या आणि ऑक्सिजन प्लांटच्या उद्घाटनासाठी ते गेले होते. त्यावेळी नितिन पटेल यांनी मनातली सल बोलून दाखवली. मी एकटाच नाही ज्यांची बस चुकली, तर माझ्यासारखे आणखी काही आहेत असं म्हणत त्यांनी नाराजांची संख्या अजून असल्याचे संकेत दिले आहेत.

loading image
go to top