'मी पुन्हा येणार नाही'; माजी मुख्यमंत्र्याने केला खुलासा

वृत्तसंस्था
Monday, 2 December 2019

मी मुख्यमंत्री असताना अनेक विकासकामे राबवून शेतकऱ्यांची 25 हजार कोटी रुपयांची कर्जे माफ केली. मात्र, माझ्या कामाची दखल काँग्रेसनेही आणि स्वकियांनीही घेतली नाही.

बंगळूर : काँग्रेसकडून युतीची शक्‍यता वर्तविली जात असतानाच सोमवारी (ता.2) माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी मात्र अप्रत्यक्षरीत्या काँग्रेसवर टीका केली. पुन्हा मुख्यमंत्री होण्याची इच्छा नाही, असे त्यांनी म्हटल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

पोटनिवडणुकीच्या प्रचारार्थ उत्तर कर्नाटकातील दौऱ्यावर असलेल्या कुमारस्वामी यांनी हुबळीमध्ये पत्रकारांसमोर पुन्हा मुख्यमंत्री होणार नसल्याचे स्पष्ट केले. 

- पुन्हा येणार, पुन्हा येणार ! तुकाराम मुंढे पुण्यात येणार !

ते म्हणाले, ''मी मुख्यमंत्री असताना अनेक विकासकामे राबवून शेतकऱ्यांची 25 हजार कोटी रुपयांची कर्जे माफ केली. मात्र, माझ्या कामाची दखल काँग्रेसनेही आणि स्वकियांनीही घेतली नाही. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह काँग्रेस आमदार असलेल्या विधानसभा मतदारसंघांसाठी 19 हजार कोटी रुपये मंजूर केले; पण त्यावर मात्र सध्या कोणीच बोलत नाही. त्यामुळेच मी हा निर्णय घेतला आहे. पोटनिवडणुकीनंतर राज्यातील राजकारणात बदल घडू शकतो. नऊ डिसेंबरनंतर सर्व काही स्पष्ट होईल.'' 

- राष्ट्रपतीपदांविषयी नाही पण 'ही' ऑफर मोदींनी दिली होती : शरद पवार

गोकाकचे भाजप उमेदवार रमेश जारकीहोळी यांचा पराभव निश्‍चित असल्याचे भाकित कुमारस्वामी यांनी केले. रमेश यांच्यावर टीका करताना, बाप-मुलाचा पक्ष म्हणून जेडीएसवर टीका केली. मात्र जेडीएस हा सर्वांचा पक्ष आहे.

- जमीन खरेदी - विक्री करताय? आधी हे वाचा.. अन्‌ टाळा आपली फसवणूक

केवळ पक्ष वाढविण्यासाठी आम्ही प्रयत्न केले; पण ज्यांनी असा अपप्रचार केला ते सर्वजण निवडणुकीत पराभूत होऊन घरी बसले असून, रमेश जारकीहोळीही घरी बसणार असल्याचा दावा कुमारस्वामींनी व्यक्‍त केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: I Dont Want Chief Minister Post says Karnataka former CM HD Kumaraswamy