पुन्हा येणार, पुन्हा येणार ! तुकाराम मुंढे पुण्यात येणार !

IAS officer Tukaram Mundhe may transferred again in Pune Corporation
IAS officer Tukaram Mundhe may transferred again in Pune Corporation

पुणे : राज्यात भारतीय जनता पक्षाच्या सरकारचा पाडाव झाल्यानंतर या पक्षाची सत्ता असलेल्या महापालिकांत आपल्या मर्जीतील वरिष्ठ अधिकारी नेमण्याचा अजेंडा नव्या आघाडी सरकारने आखला आहे. भाजपचे स्वबळ असलेल्या पुणे महापालिकेत प्रशासकीय हुकूमत करण्याच्या चातुर्याने सनदी अधिकारी डॉ. तुकाराम मुंढे यांची आयुक्तपदावर नेमणूक करण्याच्या हालचाली राज्य सरकार करीत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. परिणामी, आयुक्त सौरभ यांची यांची पुढील काही दिवस बदली होऊन त्यांच्याजागी डॉ. मुंढेंची नेमणूक होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे मुंढे पुन्हा येणार, पुन्हा येणार अशी चर्चा रंगू लागली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

राज्य सरकारांकडून नेहमीच आपल्या सोयीच्या अधिकाऱ्यांची नेमणूक करून प्रशासनावर वर्चस्वर ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. राज्यात देवेंद्र फडणवीसांचे सरकार येताच 20014 मध्ये मंत्रालयासह काही ठिकाणचे वरिष्ठ अधिकारी बदलण्यात आले होते. त्यातूनही आपल्या विरोधकांवर मात करण्याची संधी या सरकारने साधल्याचे बोलले जाते. परंतु, सत्तांतर होताच शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस आघाडीनेही अधिकारी बदलण्याचा जुनाच कित्ता गिरवला असून, विशेषत: ज्या महापालिकांत भाजपची सत्ता आहे, अशा ठिकाणीही प्रशासकीय दरारा ठेवण्याची रणनीती आखल्याचे सांगण्यात येत आहे.

पंकजा यांच्या पक्षांतराच्या चर्चांवर चंद्रकांत पाटील यांचे स्पष्टीकरण 

या पार्श्‍वभूमीवर आपापली राजकीय आणि प्रशासकीय ताकद पुन्हा वाढविण्याच्या उद्देशाने शिवसेनेसह राष्ट्रवादीनेही पुण्यात लक्ष घातले असून, फडणवीस सरकारच्या काळात नेमणूक झालेल्या आयुक्त राव यांच्यासह राज्य सरकारमधून प्रतिनियुक्तीवर आलेल्या काही वरिष्ठ अधिकाऱ्याच्या बदल केल्या जाण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, राव यांच्या कार्यकाळ पूर्ण झालेला नाही, मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या बदलीची चर्चा आहे.

बहुचर्चित रामटेक बंगला पुन्हा भुजबळांकडे; पाहा कोण कोठे राहणार

यापूर्वी पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) डॉ. मुंढे यांनी काम केले. नगरसेवकांना सुचनांना डावलून निर्णय घेतल्याने त्यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली होती. "पीएमपी'मध्ये त्यांच्या निर्णयाने सत्ताधारी भाजपला नाकीनऊ आले होते.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com