esakal | VIDEO - भारताच्या हवाई दलाने दाखवली ताकद; वर्धापन दिनानिमित्त चित्तथरारक कसरती
sakal

बोलून बातमी शोधा

IAF day

भारतीय हवाई दल 88 वा वर्धापन दिन साजरा करत आहे. जगातील सर्वात शक्तीशाली असलेल्या हवाई दलांमध्ये भारताचे हवाई दल हे चौथ्या स्थानावर आहे. 

VIDEO - भारताच्या हवाई दलाने दाखवली ताकद; वर्धापन दिनानिमित्त चित्तथरारक कसरती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - भारतीय हवाई दल 8 ऑक्टोबरला 88 वा वर्धापन दिन साजरा करत आहे. 88 वर्षांपूर्वी 1932 रोजी भारताच्या हवाई दलाची स्थापना करण्यात आली होती. यानिमित्त आयोजित कऱण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात हवाई दलाच्या पथकाने आकाशात चित्तथरारक अशा कसरती करून दाखवल्या. नभ:स्पृशं दीप्तम्। असं ब्रीद वाक्य असलेल्या हवाई दलाच्या वर्धापन दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

हवाई दल प्रमुख राकेश भदौरिया म्हणाले की, आपण 89 व्या वर्षात प्रवेश करत असून हवाई दलात परिवर्तन सुरु आहे. आपण अशा एका युगात प्रवेश करत आहोत जिथं आपण एअरोस्पेस पॉवर नियोजीत करणार आहे. तसंच मल्टी डोमेन ऑपरेशनही करणार असल्याचं राकेश भदौरिया यांनी सांगितलं. 

हे वाचा - महाराष्ट्रासह देशात 24 फेक विद्यापीठे; युजीसीने जाहीर केली यादी

हवाई दलाच्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान मोदींसह देश-विदेशातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं की, तुमच्या किर्तीने आकाश उजळू दे. भारतीय हवाई दलाच्या वर्धापन दिनी हवाई दलाला, हवाई योद्धे, अधिकारी, सैनिक आणि माजी सैनिकांसह त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा देतो. 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हवाई दलाच्या शौर्याचे कौतुक करताना म्हटलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार आपल्या पराक्रमी जवानांचा दरारा कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहे. हवाई दलाच्या वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छा. 

हवाई दलाबद्दल या गोष्टी माहिती आहेत का?
भारताच्या हवाई दलाचं नाव 1954 मध्ये रॉयल इंडियन एअरफोर्स असं करण्यात आलं होतं. त्यानंतर पाच वर्षांनी 1950 मध्ये या नावातील रॉयल हा शब्द काढून टाकण्यात आला. जगातील सर्वात शक्तीशाली असलेल्या हवाई दलांमध्ये भारताचे हवाई दल हे चौथ्या स्थानावर आहे. भारतापेक्षा सध्या अमेरिका, रशिया आणि चीनकडे मोठे आणि शक्तीशाली हवाई दल आहे. 

देशात भारतीय हवाई दलाची एकूण 60 एअरबेस आहेत. तर एकूण 1700 लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर्स हवाई दलाच्या ताफ्यात आहेत. यामध्ये 500 पेक्षा जास्त विमाने ही मालवाहू आहेत. याशिवाय वेगवेगळ्या प्रकारची हेलिकॉप्टर्सही भारताच्या हवाई दलात आहेत. 

हे वाचा - आता ‘हिंदी-जपानी’ भाई भाई

भारतातील हवाई दलांच्या एअरबेसची सात कमांडमध्ये विभागणी करण्यात आली आहे. यात वेस्टर्न एअर कमांडमध्ये सर्वाधिक 16 तर सेंट्रल एअर कमांडकडे सर्वात कमी 7 एअरबेसचं नियंत्रण आहे. 

भारताबाहेर तझाकिस्तानमधील फर्कहोर इथं भारतीय हवाई दलाचे एअरबेस आहे. असा एअर बेस देशाबाहेरील पहिला आणि एकमेव तळ आहे. 1933 पासून आतापर्यंत भारताच्या हवाई दलाच्या ध्वजावर आणि विमानांवर असलेलं बोधचिन्ह चारवेळा बदललं आहे.