IAF Fly-past in Bhopal: "सर, इथे काही होत नाही..."; एका मुलाच्या ट्विटमुळे भोपाळमध्ये झाला वायू सेनेचा एअर शो?

३० सप्टेंबर रोजी झालेल्या या शोनंतर आता या मुलाचं ट्विट व्हायरल होत आहे.
Bhopal Air Show
Bhopal Air ShowSakal

भोपाळमध्ये भारतीय वायुसेनेचा एअर शो संपन्न झाला. शूर वैमानिकांनी भोपाळ तलावावर अनेक आश्चर्यकारक पराक्रम करून दाखवले आहेत. हा क्षण पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने लोक जमले होते. एअर शो संपल्यानंतर एक ट्विट समोर आलं आहे. हे ट्विट २६ जानेवारी २०२३ चं आहे.

यामध्ये भोपाळमधील एका मुलाने ट्विट करून सर, भोपाळमध्ये फ्लाय पास्ट करा, अशी मागणी केली होती. त्याचवेळी, योगायोग असा घडला की हवाई दलाने भोपाळच्या ९१ व्या वर्धापनदिनानिमित्त एअर शो आयोजित करण्याचा निर्णय घेतला आणि मुलाची इच्छा पूर्ण झाली.

भोपाळमधील इंजिनियरिंगचा एक विद्यार्थी ट्विटरवर सक्रिय आहे. विद्यार्थ्याने २६ जानेवारीला ट्विट केलं होतं की, सर, पुढच्या वेळी भोपाळमध्ये फ्लाय पास्ट करा. इथे काही होत नाही. मोठ्या तलावावर फ्लाय पास्ट करण्यासाठी कुठे याचिका दाखल करावी लागेल? अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याच्या या ट्विटवर खूप प्रतिक्रिया आल्या. नवभारत टाईम्सने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

Bhopal Air Show
Trending News: पहिल्यांदाच उघडण्यात आलं ११४ वर्षे जुनं मेडिकल; आत काय काय सापडलं?

त्याच वेळी, ३० सप्टेंबर रोजी भोपाळमध्ये हवाई दलाच्या एअर शोचा समारोप झाला. यानंतर मुलाच्या मागणीची चर्चा सुरू झाली आहे. भोपाळमध्ये भारतीय वायुसेनेचा फ्लायपास्ट निश्चित झाला तेव्हा संरक्षण मंत्रालयाच्या नागपूर झोनच्या पीआरओने ट्विट करून सांगितलं की, सर, तुमची इच्छा पूर्ण झाली आहे. मात्र, या मुलाच्या मागणीवरून एअर शोचे आयोजन करण्यात आले आहे, असे नाही. हा निव्वळ योगायोग आहे. यासोबतच ३० सप्टेंबरला भोपाळमध्ये एअर शो झाला तेव्हा मुलगा एअर मार्शल विभास पांडे यांना भेटला. एअर मार्शलला भेटलेला मुलगा भोपाळचा आहे, तो बीटेकच्या चौथ्या वर्षाचा विद्यार्थी आहे. मात्र, हवाई दलाने या मुलाबाबत फारशी माहिती दिलेली नाही.

Bhopal Air Show
Trending News: १९ मजली इमारतीच्या अगदी मध्यातून जाणारी ही ट्रेन; व्हिडीओ पाहून थक्क व्हाल!

भारतीय वायुसेनेच्या भोजतालवर शनिवारी झालेल्या एअर शोने लोकांना मंत्रमुग्ध केलं. या एअर शोमध्ये स्वदेशी लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (LCA) तेजस, SU-30 MKI आणि मिराज-2000 सारख्या विमानांचा समावेश होता. ८ ऑक्टोबर रोजी भारतीय हवाई दलाच्या ९१ व्या वर्धापन दिनापूर्वी, लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर आणि सेंट्रल कमांडच्या इतर विमानांच्या एरोबॅटिक्स टीमने विलक्षण कौशल्य दाखवलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com