हवाई दलाचे लढाऊ विमान मिग 21 कोसळले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हवाई दलाचे लढाऊ विमान मिग 21 कोसळले

भारतीय हवाई दलाचे (Indian Air Force) लढाऊ विमान कोसळलं. मिग 21 (fighter jet Mig 21) च्या या दुर्घटनेमध्ये एका पायलटचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

हवाई दलाचे लढाऊ विमान मिग 21 कोसळले

चंदिगढ - मोगा इथं बाघापुरानातील लंगियाना खुर्द गावाजवळ भारतीय हवाई दलाचे (Indian Air Force) लढाऊ विमान कोसळलं. मिग 21 (fighter jet Mig 21) च्या या दुर्घटनेमध्ये एका पायलटचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. ट्रेनिंगसाठी स्क्वाड्रन लीडर अभिनव चौधरीने (Pilot Abhinav) मिग 21 मधून राजस्थानच्या सूरतगढ इथून हलवाडाकडे उड्डाण केलं होतं. त्यानंतर पुन्हा सूरतगढला परत येत असताना बाघापुराना इथं विमानाचा अपघात झाला.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अभिनवने नियमित ट्रेनिंगसाठी फायटर जेट मिग 21 मधून उड्डाण केलं होतं. अभिनव राजस्थानच्या सूतरगढमधून हलवाडा इथं पोहोचला होता. तिथून परत येत असताना विमान दुर्घटनाग्रस्त झाले. या दुर्घटनेची माहिती मिळताच हवाई दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे.

हेही वाचा: 'कोव्हिशिल्ड इतका कोव्हॅक्सिनचा पहिला डोस प्रभावी नाही'

अभिनवचा शोध घेण्यासाठी बराच काळ सर्च ऑपरेशन करण्यात आले. त्यावेळी अभिनवचा मृतदेह सापडला. हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. अद्याप तरी या दुर्घटनेचं कारण समोर आलेलं नाही.

loading image
go to top