

Five Dead After Indian Air Force Plane Catches Fire
आसामच्या जोरहाट एअरबेसवर भारताच्या हवाई दलाचं AN ३२ हे विमान कोसळून दुर्घटना घडली. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. लष्करी तळावर लॅँडिंगनंतर विमानाला अचानक आग लागल्यानंतर ही दुर्घटना घडल्याचं समोर आलंय. एअरबेसच्या धावपट्टीवर विमान सुरक्षित उतरलं होतं. पण त्यानंतर आगीचे लोळ उठल्याचं दिसून आलं. या घटनेनं एअरबेस परिसरात खळबळ उडाली होती.