esakal | ऑक्सिजन, कोविड सेवेसाठी IAF ची विमाने स्टँडबायवर

बोलून बातमी शोधा

air force-oxygen
ऑक्सिजन, कोविड सेवेसाठी IAF ची विमाने स्टँडबायवर
sakal_logo
By
दीनानाथ परब

नवी दिल्ली: देशात कोरोनामुळे गंभीर स्थिती निर्माण झालेली असताना, इंडियन एअर फोर्सची भूमिका महत्त्वपूर्ण राहणार आहे. अत्यावश्यक साधने देशाच्या वेगवेगळ्या भागात पोहोचवण्यासाठी इंडियन एअर फोर्सने पाच प्रकारची विमाने तैनात केली आहेत. कोविड रुग्णालय उभारणीसाठी लागणारी साधने, अत्यावश्यक औषधे, सिलिंडर आणि ऑक्सिजन कंटेनर पोहोचवण्याच्या अनेक मोहिमा आतापर्यंत एअर फोर्सने पार पाडल्या आहेत.

कामाचा अतिरिक्त भार लक्षात घेऊन, IAF ने काही विमाने स्टँड बायवरही ठेवली आहेत. "या मोहिमा पार पाडण्यासाठी एअर फोर्स आपली मालवाहतूक विमान आणि हेलिकॉप्टर्सची मदत घेणार आहे. C-17, C-130J, IL-76, An-32 या मालवाहतूक विमानांबरोबर चिनूक, Mi-17 हेलिकॉप्टपर स्टँडबायवर ठेवण्यात आले आहे."

हेही वाचा: कोरोनावर प्रभावी 'विराफीन' बद्दल तात्याराव लहानेंनी दिली महत्त्वाची माहिती

एअर फोर्सने आत्तापर्यंत अन्य देशात औषधे, लसी पोहोचवण्याबरोबरच कोची, मुंबई, बंगळुरु, दिल्ली येथून डॉक्टर्स आणि नर्सेसच्या एअरलिफ्टची जबाबदारी पार पाडलीय. IAF ने गुरुवारी हिंडन ते पश्चिम बंगालच्या पानागडपर्यंत तीन ऑक्सिनज कंटेनर्स एअरलिफ्ट केले. पानागडमध्ये ऑक्सिजन भरल्यानंतर ते देशातील वेगवेगळ्या भागात कोविड केंद्रांपर्यंत पोहोचवण्यात येईल.

हेही वाचा: स्वत:ची SUV कार विकून गरजूंना ऑक्सिजन पुरवणारा मुंबईकर चर्चेत

हे कंटेनर्स भरल्यानंतर रेल्वे किंवा रस्ते मार्गाने कोविड केंद्रांवर पोहोचवण्यात येतील. कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यामुळे देशाच्या वेगवेगळया भागात ऑक्सिजनला मोठी मागणी आहे. ऑक्सिजन वितरण वेगाने व्हावे, यासाठी C-17 आणि IL-76 या विमानांमधुन रिकामे टँकर्स ऑक्सिजन भरण्याच्या ठिकाणी पोहोचवण्यात येत आहेत.