Video: इंडियन एअर फोर्सची ताकद वाढली; जाणून घ्या स्वदेशी LCH ची वैशिष्ट्ये

देशातील विकसित लढाऊ हेलिकॉप्टर्सचा अधिकृतरित्या वायुसेनेत समावेश करण्यात आला आहे
IAF LHC VIDEO
IAF LHC VIDEOesakal

Air Force: भारतीय वायुदलातून मोठी बातमी पुढे येतेय. वायुसेनेच्या ताकदीत आता आणखी भर पडणार असून देशातील विकसित लढाऊ हेलिकॉप्टर्सचा अधिकृतरित्या वायुसेनेत समावेश करण्यात आला आहे. जोधपूरच्या वायुसेना स्टेशनवर पार पडलेल्या एका कार्यक्रमात याबाबत सांगण्यात आले. या कार्यक्रमाला सुरक्षा मंत्री राजनाथ सिंह आणि वायुसेना प्रमुख एयर चीफ मार्शल वी आर चौधरी उपस्थित होते.

वायुसेनेत दाखल होणाऱ्या हेलिकॉप्टर्समध्ये विशेष काय?

या हेलिकॉप्टर्सचा वायुसेनेत समावेश झाल्याने आता अति उंच आणि दुर्गम भागांत वायुसेनेची क्षमता आणखी जास्त वाढण्यास मदत होईल. जोधपूरमध्ये पार पडलेल्या एका कार्यक्रमात याबाबत अधिकृत घोषणाही करण्यात आली. आता या लढाऊ हेलिकॉप्टर LCHचं वैशिष्ट्य काय ते आपण जाणून घेऊया.

HAL द्वारे विकसित झालंय LCH

एलसीएच हेलिकॉप्टरला हिंदुस्तान अॅरोनॉटिक्स लिमिटेडने विकसित केलंय. या हेलिकॉप्टर्सना उंच भागांत तैनात करण्यासाठी डिझाईन करण्यात आले आहे. ५.८ टन वजन आणि दोन इंजिन असणाऱ्या या हेलिकॉप्टरमध्ये याआधीच अनेक शस्त्रांचा वापराचे परिक्षण करण्यात आले आहे.

शत्रूपासून बचाव करण्यास सक्षम

देशात विकसित करण्यात आलेल्या या कमी वजनाच्या हेलिकॉप्टर्सना असे डिझाईन करण्यात आले आहे की शत्रूंपासून स्वत:चे रक्षण करण्यास ते सक्षम आहेत. याशिवाय रात्रीच्या कोणत्याही वेळी शत्रूवर हल्ला करण्यास हे हेलिकॉप्टर तयार असणार आहे.

IAF LHC VIDEO
Air Force : भारतीय हवाई दलाला मिळणार पहिले 'मेड इन इंडिया' लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर

अति उंचावरूनही शस्त्रे ऑपरेट करण्यास सक्षम

हेलिकॉप्टरचं वजन हलकं असल्या कारणाने अतिउंचावर उडण्यास ते सक्षम आहे. त्यामुळे यांना शस्त्रांसह संपूर्ण क्षमतेने सहज ऑपरेट होऊ शकणार आहे.

प्रत्येक वातावरणात अनुकुल असणार

कमी वजनाचे हे हेलिकॉप्टर्स कोणत्याही वातावरणात झेप घेण्यास सक्षम आहेत. हे हेलिकॉप्टर्स अधिक सक्रिय, गतिशिल असणार आहेत.

सर्च आणि रेस्क्यू, शत्रूंच्या एयर डिफेंसवर हल्ला तसेच काउंट इमर्जंसी ऑपरेशनमध्ये हे हेलिकॉप्टर्स महत्वाची भूमिका निभावणार आहे. या हेलिकॉप्टरमध्ये दोन पायलट्सला बसता येणार आहे. तसेच यातून १२ रॉकेट दागून शत्रूंना नेस्तनाबूद करता येणार आहे.

सुरक्षा मंत्रायलायने सांगितले आहे की, या हेलिकॉप्टरमध्ये ४५% स्वदेशी उपकरणे आहेत. तसेच यातील १० हेलिकॉप्टर वायुसेनेत तर पाच हेलिकॉप्टर थलसेनेत दाखल होणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com